शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

अल्जेरियाचे विमान कोसळून 116 ठार?

By admin | Updated: July 25, 2014 01:27 IST

अल्जियर्सकडे येणारे एअर अल्जेरी कंपनीचे एक विमान गुरुवारी सकाळी कोसळून त्यातील सर्व 110 प्रवासी व सहा विमान कर्मचारी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे

अल्जियर्स : मध्य आफ्रिकेतील बुर्किना फासो या देशाहून अल्जियर्सकडे येणारे एअर अल्जेरी कंपनीचे एक विमान गुरुवारी सकाळी कोसळून त्यातील सर्व 110 प्रवासी व सहा विमान कर्मचारी ठार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवडय़ात एअर मलेशियाचे विमान युक्रेनमध्ये पाडण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीतील ही दुसरी मोठी दुर्घटना आहे. 
बुर्किनो फासो देशातील औगाडागौ शहरातून निघालेले हे विमान नायजेर व माले या देशांच्या सीमेलगत बेपत्ता झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु हे विमान कोसळले असल्याचे अल्जेरियन नागरी विमान वाहतूक मंत्रलयाने सायंकाळी जाहीर केले. या विमानाचा त्याच्या संभाव्य हवाई मार्गावर शोध घेण्यासाठी त्या भागात असलेली दोन लढाऊ विमाने लगेच रवाना करण्यात आली, असे फ्रेंच लष्करी प्रवक्त्याने सांगितले. तसेच मालीच्या सीमेलगत शोध घेण्यासाठी आम्हीही विमाने पाठविली, असे नायजेरच्या सुरक्षा सूत्रंनी सांगितले. परंतु या प्रवासी विमानाचा शोध लागू शकला नाही. या विमानात फ्रान्सचे 5क्, बुर्किनो फासोचे 24, लेबेनॉनचे आठ, अल्जिरियाचे चार, लक्झंबर्गचे दोन व बेल्जियम, स्वित्ङरलड, कॅमेरून, युक्रेन व रुमानिया या देशांचा प्रत्येकी एक प्रवासी होता, असे एअर अल्जिरीच्या बुर्किनो फासोमधील प्रतिनिधीने सांगितले. कर्मचा:यांपैकी सहा स्पेनचे होते.
संपर्क नेमका कधी तुटला  
अल्जेरियाची सरकारी वृत्तसंस्था एपीएसने एका स्पॅनिश एअरलाईन कंपनीच्या हवाल्याने उड्डाणानंतर तासाभरातच संपर्क तुटल्याचे सांगितले. तथापि, इतर अधिका:यांनी संपर्क तुटण्याची वेळ वेगळी सांगितली. हे विमान गाओ, मालीवर उडत असताना सकाळी सात वाजून 25 मिनिटांनी त्याच्याशी शेवटचा संपर्क झाला होता, असे एका अल्जेरियन उड्डयन अधिका:याने सांगितले, तर दुसरीकडे बुर्किना फासोतून वेगळीच माहिती समोर आली. सकाळी सात वाजून आठ मिनिटांनी या विमानाचे नियंत्रण नायजेरमधील हवाई नियंत्रण कक्षाकडे हस्तांतरित करण्यात आले होते व सकाळी दहा वाजेनंतर त्याच्याशी संपर्क तुटला, असे बुर्किनातील उड्डयन प्रशासनाने सांगितले. तत्पूर्वी, एअर अल्जिरीच्या एमडी-83 या विमानाशी संपर्क तुटल्यास स्पेनची खासगी एअरलाईन कंपनी स्वीफ्टएअरने दुजोरा दिला आहे. बुर्किना प्रशासनाने या विमानातील प्रवाशांच्या कुटुंबियांना माहिती पुरविण्यासाठी ओउअगाडोउगोउ विमानतळावर एक आपत्कालीन कक्ष स्थापन केला आहे.  (वृत्तसंस्था)
 
च्सहारा वाळवंटात झालेल्या वाळूच्या भीषण वादळामुळे भरकटून हे विमान पडले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. पण याबद्दलही उलटसुलट दावे केले जात होते. बुर्किनो फासोचे वाहतूकमंत्री जीन बर्टिन यांनी सांगितले की, वादळामुळे या विमानास मार्ग बदलण्यास सांगण्यात आले होते. मात्र नायजेरमधील निआमी येथील वाहतूक नियंत्रण कक्षाने या विमानाने त्यांच्याशी संपर्क साधल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. विमानाच्या मार्गात येणा:या बुर्किना फासो, माली, नायजेर, अल्जेरिया या देशांसह स्पेनच्या यंत्रणाही या विमानाचा शोध घेत आहेत.