भारतीय उपखंडात अल कायदा अति सक्रिय

By admin | Published: July 15, 2017 12:18 AM2017-07-15T00:18:40+5:302017-07-15T00:18:40+5:30

अतिरेकी संघटना अल कायदा भारतीय उपखंडात अधिक सक्रिय होत असून, २०१७ पर्यंत या संघटनेने शेकडो सदस्य बनविले आहेत

Al Qaeda in the Indian subcontinent is very active | भारतीय उपखंडात अल कायदा अति सक्रिय

भारतीय उपखंडात अल कायदा अति सक्रिय

Next


वॉशिंग्टन : अतिरेकी संघटना अल कायदा भारतीय उपखंडात अधिक सक्रिय होत असून, २०१७ पर्यंत या संघटनेने शेकडो सदस्य बनविले आहेत. या संघटनेचे बहुतांश ठिकाणे अफगाणिस्तानात आहेत आणि संघटनेचे प्रमुख बांगला देशात आहेत. दहशतवादविरोधी तज्ज्ञांनी अमेरिकी संसद सदस्यांना ही माहिती दिली आहे.
लष्करी डावपेचातील तज्ज्ञ सेथ जी जोन्स यांनी म्हटले आहे की, २०१७ पर्यंत अल कायदाने भारतीय उपखंडात शेकडो सदस्य बनविले आहेत. त्यांची ठिकाणे अफगाणिस्तानातील हेलमंद, कंधार, जाबुल, पख्तिया, गजनी आणि नूरिस्तान प्रांतात आहेत. अफगाणिस्तानातील अल कायदाचे अस्तित्व गत पाच ते दहा वर्षांच्या तुलनेत सध्या अधिक आणि विस्तारित आहे. जोन्स यांनी ही माहिती सभागृहाच्या अंतर्गत सुरक्षा उपसमितीसमोर सांगितली आहे.
जोन्स यांनी म्हटले आहे की, बांगला देशात अल कायदाचे सदस्य अधिक सक्रिय आहेत. ते अनेक हल्ले घडवून आणत आहेत. भारतीय उपखंडात अस- साहब या आपल्या मीडिया शाखेच्या माध्यमातून आपली मोहीम राबवीत आहेत. या अतिरेकी संघटनेने अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात तुलनेने कमी हल्ले केले आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगला देशमधील सुरक्षित ठिकाणांचा फायदा उठवत अल कायदा नेता आयमन अल- जवाहिरीने सप्टेंबर २०१४ मध्ये भारतीय उपखंडात अल कायदाशी संबंधित एक क्षेत्रीय संघटना सुरू करण्याची घोषणा केली होती.
अल जवाहिरीने म्हटले होते की, भारतीय उपखंडात जिहादचा झेंडा उंचावण्यासाठी आणि पूर्ण उपखंडात इस्लामिक शासन लागू करण्यासाठी अल कायदाची नवी शाखा कायदा अल जिहाद सुरू करण्यात आली आहे. या समूहाचे नेतृत्व असिम उमर याने केले होते. तो एक भारतीय असून, हरकत-उल-जिहाद अल-इस्लामीचा तो माजी सदस्य होता. ही संघटना पाकिस्तानची आहे. भारतीय उपखंडात त्यांच्या शाखा आहेत.
>आधी प्रभावी नव्हती
अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटमधील एक संशोधक विद्यार्थी कॅथरिन जिम्मरमेनने संसद सदस्यांना सांगितले की, अल जवाहिरीकडून नवी शाखा सुरू करण्याची घोषणा झाल्यानंतरही भारतीय उपखंडात अल कायदा संघटना फारशी प्रभावी नाही.
२०१५ पर्यंत अल कायदाने अफगाणिस्तानात मोठे प्रशिक्षण शिबीर सुरूठेवले होते. अमेरिकेने आॅक्टोबर २०१६ मध्ये हवाई हल्ले करून अल कायदाच्या नेत्यांना ठार मारले.

Web Title: Al Qaeda in the Indian subcontinent is very active

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.