शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

अल-कायदाची भारतातही शाखा

By admin | Updated: September 5, 2014 03:53 IST

भारतात जिहाद छेडण्यासाठी अल-काईदाने एक नवी शाखा स्थापन केल्याची माहिती अमेरिकी प्रसारमाध्यमे व गुप्तचर सूत्रंनी गुरुवारी येथे दिली.

केंद्राची गंभीर दखल : नवा व्हिडीओ , देशभर सतर्कता
 
वॉशिंग्टन : भारतात जिहाद छेडण्यासाठी अल-काईदाने एक नवी शाखा स्थापन केल्याची माहिती अमेरिकी प्रसारमाध्यमे व गुप्तचर सूत्रंनी गुरुवारी येथे दिली. भारतीय उपखंडात शरिया लागू करून खिलाफतचे (इस्लामी राजवट) पुनरुज्जीवन करण्याचाही उद्देश यामागे आहे.  
अल-काईदाची माध्यम संघटना असलेल्या ‘अस सहाब’ने ‘काईदात अल-जिहाद इन द इंडियन सबकॉन्टीनेन्ट’ असे या शाखेचे नाव असल्याची घोषणा केली आहे. यू-टय़ूबसह इतर सामाजिक संकेतस्थळांवर टाकण्यात आलेल्या व्हिडिओमधून ही माहिती समोर आली आहे. 
पाकिस्तानी दहशतवादी असीम उमर हा या शाखेचा प्रमुख असून तालिबानप्रमुख मुल्ला ओमर हा त्याचा वरिष्ठ नेता आहे. 
अल-काईदा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रिय आहे. मात्र, या संघटनेचा नेता अयमन अल जवाहिरी याने सांगितले की, ‘काईदात अल जिहाद’ ही लढाई आता भारतासह म्यानमार व बांगलादेशर्पयत नेणार आहे. 
जवाहिरीने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, अल-काईदाची भारतीय उपखंडासाठी काईदात अल जिहाद ही नवी शाखा स्थापन करण्यात आली आहे. 
ही शाखा संपूर्ण भारतीय उपखंडात जिहाद चरमसीमेला पोहोचवूून इस्लामी राजवट परत आणोल, तसेच शरियाला बळकट बनवेल. ही शाखा भारतीय उपखंड, म्यानमार, बांगलादेश, आसाम, गुजरात, अहमदाबाद आणि काश्मिरातील कमकुवत लोकांची सुरक्षा करेल. ही शाखा आज स्थापन झालेली नाही. गेल्या दोन वर्षाच्या परिश्रमाची ती फलनिष्पत्ती आहे. भारतीय उपखंडातील मुजाहिद्दीनींना कायदात अल जिहादच्या ङोंडय़ाखाली एकत्र आणण्यात आले आहे. 
55 मिनिटांच्या या व्हिडिओत जवाहिरी म्हणाला की, ओसामा बिन लादेनच्या आवाहनानुसार काईदात अल जिहादची स्थापना करण्यात आली आहे. 
लादेनने शत्रूंविरुद्ध जिहाद सुरू करण्याचे, आपली भूमी स्वतंत्र करण्याचे, तसेच आपली सत्ता पुनस्र्थापित करण्याचे आवाहन केले होते. अल-काईदाची स्थापना लादेनने केली होती. अमेरिकी कमांडोंनी मे 2क्11 मध्ये पाकमध्ये कारवाई करून त्याचा खात्मा केला होता. 
(वृत्तसंस्था) 
 
4दोन दिवसांपूर्वी अल-काईदाची प्रचारी पत्रके पाकिस्तानात वाटण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर जवाहिरी यांचे हे 45 मिनिटांचे व्हिडिओ भाषण जारी करण्यात आले आहे. 
4खरे तर सिरिया आणि इराक या दोन देशांमधील दीर्घकालीन गृहयुद्ध व अस्थिरतेचा फायदा घेत ‘इस्लामिक स्टेट ऑफ सिरिया अॅण्ड इराक’ (इसिस) हा नवा कट्टर मुस्लिम बंडखोर, दहश्तवादी गट उदयास येऊन त्याने या दोन्ही देशांच्या सीमेलगतच्या मोठय़ा भूभागावर कब्जा केला    आहे.
 
4‘इसिस’ हा जागतिक शांततेला अल-काईदाहून मोठा धोका मानला जाऊ लागला आहे. त्यामुळे आपले प्राबल्य दाखविण्यासाठी ‘अल काईदा’ने हा नवा व्हिडिओ जारी केल्याचे सुरक्षाविषयक तज्ज्ञांना वाटते. याच दृष्टीने जवाहिरी याने ‘इसिस’चे नेतृत्व न स्वीकारताना अफगाणिस्तानमधील तालिबानचे प्रमुख मुल्ला ओमर याला नेता मानले आहे.
 
केंद्राची गंभीर दखल : देशभर सतर्कता
नवी दिल्ली : अल-काईदा या दहशतवादी संघटनेने भारतीय उपखंडात इस्लामचे राज्य आणण्याची शपथ घेणारा तसेच जिहादी चळवळीचा प्रसार करण्याची धमकी देणारा व्हिडिओ जारी केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रलय, गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा संस्था सतर्क झाल्या आहेत़ केंद्र गृहमंत्रलयाने देशभर सतर्कतेचा इशारा जारी केला आह़े
अल काईदाची अधिकृत मीडिया संघटना अस-सहाबने युटय़ूब आणि सोशल नेटवर्कीग साईटवर गुरुवारी व्हिडिओ जारी केला आह़े अल-काईदाचा म्होरक्या अयमन अल जवाहिरी याने या व्हिडिओत भारतीय उपखंडात ‘काईदात अल जिहाद’ ही अल-काईदाची नवी शाखा स्थापन झाल्याची घोषणा केली आह़े भारतीय उपखंडांतील देशात इस्लामचे राज्य आणण्याची धमकीही यात दिली आह़े  हा व्हिडिओ प्रसारित होताच केंद्र सरकारने भारतीय गुप्तचर यंत्रणांना त्याची सत्यता पटविण्याचे निर्देश दिले होत़े  भारतीय गुप्तचर यंत्रणांनी प्राथमिक तथ्यांच्या आधारे हा व्हिडिओ खरा असल्याचे स्पष्ट केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलवली़ बैठकीनंतर गृहमंत्रलयाने सर्व राज्ये आणि सुरक्षा संस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आह़े वरिष्ठ सुरक्षा अधिका:यांशी चर्चा केल्यानंतर राजनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती देणो टाळल़े या व्हिडिओबाबत पंतप्रधान कार्यालयाला कळविण्यात आले आहे, केवळ एवढेच ते म्हणाल़े 
(लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 अतिरिक्त पावले उचलू : जम्मू काश्मीर पोलीसप्रमुख
4श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पाय रोवण्याचे अतिरेकी संघटनांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 
4आव्हानांशी निपटण्यासाठी आम्ही अतिरिक्त पावले उचलू़, असे जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक राजेंद्र कुमार यांनी सांगितले.
 
पाकवरील दबाव वाढवावा -काँग्रेस प्रवक्ते तिवारी
4भारत सरकारने याची गंभीर दखल घेऊन 26/ 11च्या अतिरेकी हल्ल्याचा खटला लवकर निकाली काढण्यासाठी पाकिस्तानवर वाढीव दबाव आणायला हवा, असे काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले.