वस्त्रोद्योग बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. याच वस्त्रोद्योगाला भारतासह मध्य आशियातील अनेक देश बळ देतात. ते म्हणजे वस्त्रोद्योग प्रमुख क्षेत्र असलेल्या बांगलादेशला कपडे बनवण्यासाठी भारतातून मोठ्या प्रमाणात कापसाची निर्यात केली जाते. पण, अमेरिका आणि बांगलादेशमध्ये झालेल्या करारामुळे याचा भारतावर परिणाम होणार आहे.
मोहम्मद यूनुस यांच्या अंतरिम सरकारने ९ फेब्रुवारी रोजी अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार केला आहे. १२ फेब्रुवारी बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान झाले. त्याच्या तीन दिवस आधीच यूनुस सरकारने हा करार केला. हा करार यूनुस सरकारने अत्यंत गोपनीय ठेवला होता. याचा मुसदाही कोणालाही दाखवला गेला नाही.
बांगलादेश अमेरिकेतली कराराचा भारतावर परिणाम काय?
अमेरिकेसोबत झालेल्या करारामुळे बांगलादेश आता भारताकडून कापूस खरेदी हळूहळू कमी करणार आहे. बांगलादेशने घोषणा केली आहे की, भारताऐवजी आम्ही आता अमेरिकेकडून कापूस खरेदी करणार आहोत.
बांगलादेशला होणार फायदा
बांगलादेशचे अंतरिम पंतप्रधान मोहम्मद यूनुस यांचे सल्लागार शफीकुल आलम यांनी एका मुलाखतीत सांगितले की, अमेरिकेसोबत जो व्यापार करार झाल आहे तो गेमचेंजर ठरणारा आहे. बांगलादेशला अमेरिकेतील बाजारात पोहोचण्यासाठी यामुळे मदत होणार आहे. जे की बांगलादेशासाठी खूप महत्त्वाचे आहे.
अमेरिकेने बांगलादेशसोबत करार करताना १९ टक्के टॅरिफ लावला आहे. अमेरिकेने हे स्पष्ट केले आहे की, बांगलादेशने अमेरिकेत उत्पादन झालेल्या कापूस किंवा मानव निर्मित फायबरचा वापर केला तर त्यावर कोणताही टॅरिफ आकारला जाणार नाही. म्हणजे शून्य टक्के टॅरिफने कापूस विकत घेऊन बांग्लादेश अमेरिकेत कोणताही टॅरिफशिवाय कपडे अमेरिकेत विकणार आहे.
भारताचा सर्वात मोठा कापूस खरेदीदार
वस्त्रोद्योग मोठा असलेला बांगलादेश हा भारताचा सर्वात मोठा कापूस खरेदीदार आहे. कारण तितके कापसाचे उत्पादन बांगलादेशामध्ये होत नाही. त्यामुळे बांगलादेश आणि मध्य आशियातील देशांकडून कापूस खरेदी करतो आता अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार करारामुळे कापूस पुरवठा करणाऱ्या देशाच्या यादीत अमेरिका पहिल्या क्रमांकावर आला आहे.
२०२४ मध्ये भारताने बांगलादेशला १.६ अरब डॉलर इतक्या कापसाच्या गाठी आणि जवळपास ८.५ करोड डॉलरच्या मानवनिर्मित फायबर गाठी विकल्या होत्या. कापसाच्या गाठी रस्ते मार्गांने पाठवल्या गेल्या होत्या.
Web Summary : A US-Bangladesh trade agreement impacts India as Bangladesh will reduce cotton imports from India and instead source from the US due to tariff benefits. This deal favors Bangladesh's access to the US market, potentially affecting India's cotton exports.
Web Summary : अमेरिका-बांग्लादेश व्यापार समझौते से भारत प्रभावित होगा क्योंकि बांग्लादेश टैरिफ लाभ के कारण भारत से कपास का आयात कम करेगा और इसके बजाय अमेरिका से प्राप्त करेगा। यह सौदा बांग्लादेश के लिए अमेरिकी बाजार तक पहुंच को सुगम बनाता है, जिससे भारत के कपास निर्यात पर असर पड़ सकता है।