शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं

By admin | Updated: June 10, 2016 13:20 IST

अमेरिकेने पाकिस्तानला तुमच्या देशात भारतावर हल्ले करण्यासाठी कट रचले जात नाही आहेत ना याची खातरजमा करा असा सल्ला दिला आहे

ऑनलाइन लोकमत 
वॉशिंग्टन, दि. 10 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौ-यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादावरुन खडसावलं आहे. अमेरिकेने पाकिस्तानला तुमच्या देशात भारतावर हल्ले करण्यासाठी कट रचले जात नाही आहेत ना याची खातरजमा करा असा सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे भाषण करताना दहशतवादापासून संपूर्ण जगाला धोका असून, आमच्या शेजारीच दहशतवादाचे केंद्र आहे म्हणत अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानवर टीका केली होती. 
 
'पाकिस्तानचे भारतासोबत संबंध सुधारावेत यासाठी अमेरिकेने उचललेलं हे पाऊल असल्याचं', अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मार्क टोनर यांनी सांगितलं आहे. 'पाकिस्तान आणि भारताने  एकमेकांशी चर्चा तसंच मदत केल्यास परिस्थिती सुधारु शकते. यासाठी काही पावलं उचलण्याची गरज आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानने आपल्या देशातील जमिनीवर भारतावर हल्ला करण्यासाठी कट रचले जात नाहीत ना याची खातरजमा करावी. तसंच आपल्या देशातील सर्व दहशतवादी संघटनांविरोधात कारवाई करावी', असंही मार्क टोनर बोलले आहेत.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-यात ओबामांसोबत झालेल्या चर्चेत पाकिस्तान महत्वाचा मुद्दा होता अशी माहिती मार्क टोनर यांनी दिली आहे. दहशतवादाविरुद्ध पाकिस्तानने लढा उभारल्यास त्यांना आम्ही साथ देऊ. केवळ दहशतवादाच्या मुद्यावर आम्ही पाकिस्तानला सहकार्य करण्यास तयार आहोत, असंही टोनर यांनी नमूद केलं.
 
भारत आणि पाकिस्तान यांच्याशी अमेरिकेशी द्विपक्षीय संबंध चांगले आहेत. एका देशाशी चांगले संबंध म्हणजे दुसऱ्या देशाशी वाईट असं नाही. दोन्ही देशांचे प्रश्न वेगळे आहेत, असंही मार्क टोनर बोलले आहेत. 
 
 
दहशतवादापासून संपूर्ण जगाला धोका असून, आमच्या शेजारीच दहशतवादाचे केंद्र आहे. राजकीय स्वार्थासाठी दहशतवादाचा वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे, असा थेट हल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाकिस्तानचे नाव न घेता चढविला होता. 
 
अमेरिकी संसदेच्या संयुक्त सभागृहापुढे बुधवारी भाषण करताना त्यांनी भारताची दहशतवादाबद्दलची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आज जगालाच दहशतवादापासून गंभीर धोका आहे. मात्र काही देश राजकीय स्वार्थासाठी दहशतवादाचा वापर करीत आहेत. दहशतवाद्यांना काही देशांत पोसले जात आहे. त्यांच्यावर आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे. सर्वांनी मिळूनच दहशतवादाचा बिमोड करायला हवा.