शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

ट्रम्प यांनी 145 टक्के टॅरिफ लादल्यानंतर, जिनपिंग यांचं EU ला मोठं आवाहन; म्हणाले, "अमेरिकेच्या दादागिरीविरोधात..."!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:04 IST

अमेरिका कसलाही विचार न करता याच पद्धतीने पावले उचलत राहिला, तर आपणही व्यापार युद्धासाठी तयार आहोत. असेही चीनने म्हटले आहे.

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफनंतर, चीनचे धाबे दणाणले आहेत. आता चीनने, अमेरिकेच्या दादागिरीविरोधात एकत्र येऊन काम करायला हवे, असे आवाहन युरोपीय संघाकाला केले आहे. अमेरिकेने चीनकडून येणाऱ्या काही वस्तूंवर तब्बल १४५ टक्क्यांपर्यंतचा तगडा टॅरिफ लावल्यानतंर चीनने युरोपीय संघाला हे आवाहन केले आहे. 

याशिवाय, अमेरिका कसलाही विचार न करता याच पद्धतीने पावले उचलत राहिला, तर आपणही व्यापार युद्धासाठी तयार आहोत. असेही चीनने म्हटले आहे.

सरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार, व्यापारासंदर्भात अमेरिकेचा सामना करण्यासाठी युरोपीय संघाने चीनसोबत काम करायला हवे, असे शी जिनपिंग यांनी म्हटले आहे. 

जिनपिंग म्हणाले, "चीन आणि युरोपला एकत्रितपणे, आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या पार पाडायला हव्यात आणि अमेरिकेच्या एकतरफी धोरणांचा विरोध करायला हवा. यामुळे केवळ दोघांचे अधिकारच नव्हे, तर हिताचेही संरक्षण होईल. याशिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर न्याय आणि बरोबरीलाही बळकटी मिळेल."

काय म्हणाले स्पेनचे पंतप्रधान -स्पेनचे पंतप्रधान म्हणाले, व्यापारासंदर्बात सुरू असलेल्या तणावामुळे युरोपीय संघ आणि चीन यांच्यातील सहकार्य संपुष्टात यायला नको.  याच बरोबर, "स्पेन आणि युरोपला चीन सोबतच्या व्यापारात घाटा होत आहे, असेही पेड्रो सांचेज यांनी मान्य केले. एवढेच नाही, तर आपले नाते आणि भविष्यातील सहकार्य यांवर या व्यापार तणावाचा कसलाही परिणाम व्हायला नको, असेही त्यांनी म्हटले आहे. स्पेन चीनकडून दरवर्षी 50 बिलियन डॉलरचे सामान खरेदी करतो.

अमेरिके चीन टॅरिफ वॉर -अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 एप्रिलला चीन विरोधात 34 टक्के टॅरिफची घोषणा केली. यानंतर चीननेही प्रत्त्युत्तरात अमेरिकेवर 34 टक्के टेरिफ लावला. यानंतर मंगळवारी ट्रम्प यांनी पुन्हा चीनवर 104 टक्क्यांचा अतिरिक्त टॅरिफ लावला. यानंतर चीनने पुन्हा पलटवार करत बुधवारी अमेरिकन वस्तूंवर आपला अतिरिक्त टॅरिफ 34 टक्क्यांवरून वाढवून 84 टक्के केला. हा टॅरिफ गुरुवारी, 10 एप्रिलपासून लागू झाला. यानंतर अमेरिकेने पुन्हा टॅरिफ वाढवून तो 125 टक्के केला. याशिवाय, अमेरिकेने 75 देशांवर लादलेल्या टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली आहे.

टॅग्स :Xi Jinpingशी जिनपिंगTrade Tariff Warटॅरिफ युद्धchinaचीनAmericaअमेरिका