शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
3
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
4
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
5
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
6
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
7
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
8
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
9
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
10
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
11
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
12
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
13
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
14
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
15
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
16
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
17
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
18
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
19
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो

पॉर्नस्टार प्रकरणानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी २४ तासांत जमविले ३२ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2023 11:12 IST

२००६ मध्ये झाली प्रकरणाला सुरूवात

न्यूयॉर्क: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मॅनहटन न्यायालयात फौजदारी खटला चालविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरच्या चोवीस तासांत ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या प्रचाराच्या माध्यमातून ३२ कोटी ८७ लाख रुपये (४० लाख डाॅलर) इतका निधी गोळा केला. ट्रम्प हे ४ एप्रिल रोजी न्यायालयासमोर शरण येणार आहेत. या घडामोडींमुळे त्यांचे मार-ए-लागो येथील निवासस्थान, ट्रम्प टॉवर, मॅनहटन न्यायालय येथील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. २०२४च्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक लढविण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इरादा असला तरी त्याला फौजदारी खटल्यामुळे सुरूंग लागण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटला चालविला जाणार ही बातमी पसरल्यावर त्यांचे समर्थक सक्रिय झाले. शुक्रवारी फ्लोरिडा येथील मार-ए-लागो येेथे त्यांच्या निवासस्थानाबाहेर समर्थक गोळा झाले होते.

२००६ मध्ये झाली प्रकरणाला सुरूवात

- २००६ साली पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स हिच्याबरोबर डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रेमप्रकरणाला सुरूवात झाली. - २०१६मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प रिंगणात उतरले. त्यावेळी प्रेमप्रकरणाबाबत मौन बाळगावे म्हणून त्यांनी स्टॉर्मीला १ कोटी ७ लाख रुपये दिले होते. - याची बातमी अमेरिकेतील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केली. त्यानंतर फौजदारी कारवाई सुरू झाली. - याच प्रकरणाच्या आधारे ट्रम्प यांच्यावर खटला दाखल करण्यात आला आहे.

स्टाॅर्मीने ‘फुल डिस्कलाेजर’ या तिच्या आत्मचरित्रात डाेनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख केला आहे. ही भेट झाली त्यावेळी ट्रम्प यांची तिसरी पत्नी मेलेनिया यांनी नुकताच मुलगा बॅरन याला जन्म दिला हाेता. एका पेंटहाऊसमध्ये ही भेट झाली हाेती. त्यानंतर दाेघांचे प्रेमप्रकरण फुलले.

पोलिसांच्या रजा रद्द

- माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर होत असलेल्या कारवाईमुळे अमेरिकेत येत्या काही दिवसांत उग्र निदर्शने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉशिंग्टन व अन्य ठिकाणच्या पोलिसांच्या रजा रद्द करून त्यांना कामावर बोलाविण्यात आले आहे. - न्यूयॉर्कमध्ये पोलीसांनी कडक बंदोबस्त राखला आहे. मॅनहटन न्यायालयाच्या परिसरात अधिक संख्येने पोलीस तैनात करण्यात आले आहेत. 

सुरक्षेचा घेतला आढावा

डोनाल्ड ट्रम्प ३ एप्रिल रोजी फ्लोरिडाहून न्यूयॉर्कला येतील. त्या रात्री ते ट्रम्प टॉवर येथे मुक्काम करतील व ४ एप्रिलला ते सकाळी मॅनहटन न्यायालयासमोर शरण येणार आहेत. त्यामुळे न्यूयॉर्कच्या पोलीस अधिकाऱ्यांनी ट्रम्प व न्यायालय परिसरातील  सुरक्षा व्यवस्थेचा शुक्रवारी आढावा घेतला.

वॉशिंग्टन येथील राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊसच्या बाहेर ट्रम्प समर्थकांनी ‘सेव्ह अमेरिका’ अशी घोषणा लिहिलेल्या टोप्या व अन्य वस्तूंची विक्री करून अनोख्या पद्धतीने निदर्शने केली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका