शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 15:12 IST

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना केली जारी

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी काही दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ भारतीय निष्पाप हिंदू नागरिकांची हत्या केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून कठोर पावले उचलण्यात आली. सिंधू पाणी करार रद्द करण्यात आला. तसेच ४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारतातून बाहेर होण्यास सांगण्यात आले. याशिवाय, भारतातील पाकिस्तानचे उच्च आयुक्तालयही बंद करण्यात आले. भारताने कडक कारवाई केल्यानंतर पाकिस्तान बिथरला असून त्यांनी दुसऱ्याच दिवशी क्षेपणास्त्र चाचणी करण्याची घोषणा केली आहे. पाकिस्तानने २४ किंवा २५ एप्रिल रोजी त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रात कराची किनाऱ्याजवळ जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना जारी केली आहे.

पाकिस्तानच्या कुरापतींकडे भारताची बारीक नजर

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केल्यामुळे पाकिस्तानमध्ये घबराटीचे वातावरण आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर कारवाई केली असल्याने पाकिस्तानचे धाबे दणाणले आहे. अशा वेळी बिथरलेल्या पाकिस्तानने लगेच दुसऱ्याच दिवशी मिसाईल टेस्टची घोषणा केली आहे. पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही कमी होत नसल्याने पाकिस्तानच्या या घोषणेनंतर भारतीय एजन्सी या चाचणीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. तसेच भारतीय सुरक्षा यंत्रणादेखील इतर सर्व घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत.

क्षेपणास्त्र चाचणी कधी होणार?

वृत्तसंस्था एएनआयने संरक्षण सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तानने २४, २५ एप्रिल रोजी कराची किनाऱ्याजवळ त्यांच्या विशेष आर्थिक क्षेत्रातून चाचणी घेण्याची माहिती दिली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे असे हे मिसाइल आहे. हे क्षेपणास्त्र चाचणी करण्याची अधिसूचना पाकिस्तानने जारी केली आहे. त्यामुळे संबंधित भारतीय संस्था या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत.

'बीटिंग द रिट्रीट' सेरेमनी रद्द

पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे पुन्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. हल्ला झाल्यानंतर भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांनी बॅगा पॅक करून पाकिस्तानात जाण्यासाठी LOC वर गर्दी केली आहे. भारतीयांना बदला हवाय असा सूर देशभरातून उमटू लागला आहे. यादरम्यान, बीएसएफ केंद्राच्या एका आदेशाची वाट पाहत आहे. सूर्यास्तापूर्वी आदेश आला तर दररोज होणारा बीटिंग द रिट्रीट सेरेमनी बंद करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाIndiaभारतPakistanपाकिस्तानJammu Kashmirजम्मू-काश्मीर