शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अभिनंदन यांना पकडल्यानंतर लष्करप्रमुख बाजवा बैठकीत भीतीने थरथर कापत होते; खासदाराची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 06:34 IST

Pakistan News : विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) पक्षाचे खासदार अयाझ सादिक यांनी केला  आहे.

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका झाली नसती तर भारत पाकिस्तानवर हवाई हल्ले करण्याच्या तयारीत होता, असा गौप्यस्फोट पाकिस्तान मुस्लीम लिग (नवाझ) पक्षाचे खासदार अयाझ सादिक यांनी केला  आहे. या माहितीला भारताचे माजी  हवाई दलप्रमुख बिरेंदरसिंग धनोआ यांनी दुजोरा दिला आहे. 

फॉरवर्ड ब्रिगेड होते हल्ल्याचे लक्ष्य : धनोआवर्धमान यांची पाकने मुक्तता केली नसती तर त्या देशाच्या फॉरवर्ड ब्रिगेडवर  हवाई हल्ले चढविण्याची योजना भारताने आखली होती, असे माजी हवाई दलप्रमुख बिरेंदरसिंग धनोआ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी पार्लमेंटमध्ये यासंदर्भात देण्यात आलेली माहिती खरी आहे, असेही त्यांनी सांगितले.  

बालाकोट हल्ल्याद्वारे भारताने दिले होते उत्तरपुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यामुळे जनमानस संतप्त झाले. केंद्र सरकारने या हल्ल्याची गंभीर दखल घेत २६ फेब्रुवारी २०१९ रोजी पाकिस्तानातील खैबर पख्तनख्वा या प्रांतातील बालाकोट या ठिकाणी असलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण छावण्यांवर हवाई हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा न ओलांडता भारतीय हवाई दलाने ही कामगिरी पार पाडली होती.  

नेमका दावा काय केला?संभाव्य हवाई हल्ल्यासंदर्भात परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी  यांनी घेतलेल्या बैठकीत भीतीने गाळण उडालेले पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांचे पाय लटपटत होते, असा दावाही सादिक यांनी केला आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमान