शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या लसी स्वीकारा अन्यथा...; भारताचा युरोपियन युनियनला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 06:00 IST

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या भारतीयांना युरोपचा प्रवास करू द्या, असे आवाहन भारत सरकारकडून युरोपियन युनियनला करण्यात आले आहे.

ठळक मुद्देग्रीन पास असलेल्या युरोपियन नागरिकांना आम्ही अनिवार्य क्वारंटाइनमधून सवलत देऊ; पण यासाठी एक अट आहे. तुम्ही कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला मंजुरी द्या,’ असे भारताकडून युरोपियन युनियनला सांगण्यात आले आहे. 

नवी दिल्ली : देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे देशात लसीकरण मोहिमेला वेग दिला जात आहे. भविष्यात परदेशी प्रवास करताना लसीकरण महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, युरोपियन युनियनने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा समावेश ग्रीन पास योजनेत केलेला नाही. त्याबद्दल भारताकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. दोन्ही लसी स्वीकारा; अन्यथा युरोपियन युनियनच्या नागरिकांना भारतात आल्यावर क्वारंटाइन करण्यात येईल, असा थेट इशारा भारताकडून देण्यात आला आहे.

युरोपियन युनियनने आपल्या ग्रीन पास योजनेंतर्गत प्रवासावरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनची लस घेतलेल्या भारतीयांना युरोपचा प्रवास करू द्या, असे आवाहन भारत सरकारकडून युरोपियन युनियनला करण्यात आले आहे. युरोपियन युनियनमध्ये २७ देशांचा समावेश आहे. ‘ग्रीन पास असलेल्या युरोपियन नागरिकांना आम्ही अनिवार्य क्वारंटाइनमधून सवलत देऊ; पण यासाठी एक अट आहे. तुम्ही कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला मंजुरी द्या,’ असे भारताकडून युरोपियन युनियनला सांगण्यात आले आहे. 

ग्रीन पास योजना म्हणजे काय?युरोपियन वैद्यकीय संस्थेने (ईएमए) मंजुरी दिलेल्या लसी घेतलेल्या लोकांना युरोपियन युनियनमध्ये प्रवास करताना विशेष सवलत देण्यात येणार आहे. कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा समावेश ग्रीन पास योजनेत करण्यात आलेला नाही. भारतात लसीकरणात याच दोन लसींचा प्रामुख्याने वापर होत आहे. 

जुलैमध्ये राज्यांना १२ कोटी डोस जूनमध्ये ११.५ कोटी लसीकरण झाले असून जुलैमध्ये राज्यांना १२ कोटी डोस देण्यात येतील, असे आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी सांगितले. खासगी हॉस्पिटलला या महिन्यात अधिक डोस देण्यात येणार आहेत. 

कोविशिल्ड : नऊ देशांत करता येणार प्रवासऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आईसलँड, आयर्लंड आणि स्पेनसह नऊ युरोपियन देशात कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीय प्रवाशांना आता प्रवास करता येणार आहे, असे सूत्रांनी गुरुवारी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीCorona vaccineकोरोनाची लस