शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Nigeria Church Attack : रक्तरंजित रविवार! नायजेरियात प्रार्थनेदरम्यान चर्चमध्ये गोळीबार; लहान मुलांसह 50 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 09:57 IST

Nigeria Church Attack : सामूहिक प्रार्थनेच्या वेळी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात तब्बल 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत.

नायजेरियामध्ये मोठा रक्तपात पाहायला मिळाला आहे. हल्लेखोरांनी रविवारी कॅथोलिक चर्चवर भीषण हल्ला झाला. सामूहिक प्रार्थनेच्या वेळी अंदाधुंद गोळीबार केला आहे. या गोळीबारात तब्बल 50 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा हल्ला नेमका कोणी केला आणि का केला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. 

ओंडो प्रदेशच्या सेंट फ्रान्सिस कॅथोलिक चर्चमध्ये ही भयंकर घटना घडली आहे. रविवारा प्रार्थना करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा झाले होते. याच दरम्यान बंदूक घेऊन काही हल्लेखोर आत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. बंदुकधारी हल्लेखोरांनी चर्चच्या इमारतीच्या बाहेर आणि आतील लोकांवर गोळ्या झाडल्या, असे ओंडो राज्याचे पोलीस प्रवक्ते फनमिलायो इबुकुन ओदुनलामी यांनी सांगितले. रविवारी पेन्टेकोस्ट सण साजरा करण्यासाठी लोक चर्चमध्ये जमले होते. सर्वत्र आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण होते. 

अचानक बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने चर्चचा परिसर हादरून गेला. मृतांमध्ये अनेक लहान मुलांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर जखमींना चर्चमधून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ओंडोचे गव्हर्नर रोटिमी अकेरेडोलू यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. आम्हाला खूप दु:ख झालं आहे. आमच्या शांतीप्रिय लोकांवर शत्रूंनी हल्ला केल्याचं म्हटलं आहे. 

अधिकाऱ्यांनी मृतांचा नेमका आकडा अद्याप जाहीर केलेला नाही. पण टिमिलीनने कमीत कमी 50 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी हा आकडा वाढू शकत असल्याचं देखील सांगितलं. हा हल्ला कोणी आणि का केला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. आतापर्यंत कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. यामध्ये रक्ताच्या थारोळ्यात लोक पडलेले पाहायला मिळत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Firingगोळीबार