शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अबू बकर अल-बगदादीचा मुलगा ठार, आयसीसचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 14:10 IST

हुतैफा अल- बद्री असे त्याचे नाव असून हातात रायफल घेतल्याचे त्याचे एक चित्रही आय़सीसने या बातमीबरोबर प्रसिद्ध केलं आहे.

बैरुत- आयसीसचा म्होरक्या अबू बकर अल बगदादीचा मुलगा सीरियाच्या सरकारविरोधात लढताना मरण पावल्याचे आयसीसने स्पष्ट केले आहे. त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आयसीसने समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. हुतैफा अल- बद्री असे त्याचे नाव असून हातात रायफल घेतल्याचे त्याचे एक चित्रही आय़सीसने या बातमीबरोबर प्रसिद्ध केलं आहे.

 

हुतैफा अल बद्री चांगला लढवय्या होता आणि रशियन व सीरियन फौजांशी लढताना मध्य होम्स प्रांतात तो मारला गेला असे आयसीसने सांगितले आहे. मात्र तो कधी मारला गेला याबद्दल काहीही सांगण्यात आलेले नाही. अल बगदादी हा जखमी झाला किंवा मरण पावला अशा अनेकदा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत मात्र त्याच्या मृत्यूबद्दल अनेकदा शंका घेतली जाते. त्याच्या कुटुंबाबद्दलही फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. 2014 साली त्याच्या कथित पत्नी आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले होते.

बगदादी नक्की कितीवेळा मारला गेला?जून 2016दरम्यान, जून 2016 मध्ये इसिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख अबू बकर अल बगदादी नाटोच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आली होती. तथापि, अमेरिका किंवा इतर देशांकडून याला दुजोरा मिळू शकला नव्हता. ओसामा बिन लादेननंतरचा जगातील सर्वांत क्रूर दहशतवादी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अबू बकरवर १६० कोटी रुपयांचे बक्षीस आहे. नाटोने इसिसचा सीरियातील बालेकिल्ला असलेल्या रक्कामध्ये केलेल्या हल्ल्यात अबू मारला गेल्याचे या वृत्तात म्हटले गेले होते.  जुलै 2017 सीरियामधील निरीक्षक गटाने सूत्रांच्या हवाल्याने अबू बकर अल बगदादी ठार झाल्याचा दावा केला होता. सीरियामध्ये मानवी हक्कासाठी हा निरीक्षकांचा गट कार्यरत आहे. यापूर्वी सुद्धा अनेकवेळा बगदादी ठार झाल्याचा दावा करण्यात आला. निरीक्षकांचा हा गट सीरियामधील गृहयुद्धावर विश्वसनीय माहिती देण्यासाठी ओळखला जातो. सीरियाच्या पूर्वेकडे असणा-या डायर-अल-झोर शहरातील सूत्रांच्या हवाल्याने निरीक्षकांच्या गटाने बगदादी ठार झाल्याचे म्हटले आहे. पण तो कधी मारला गेला ते निरीक्षकांच्या गटाने स्पष्ट केलेले नव्हते.  मे 2017 महिन्याच्या शेवटी रशियानेही बगदादी हवाई हल्ल्यात ठार झाल्याचा दावा केला होता. रशियाला इसीसच्या प्रमुखांची बैठक होणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली होती. यानंतर हा हवाई हल्ला करण्यात आला अशी अधिकृत माहिती मंत्रालयाने आपल्या फेसबूक पेजवरुन दिली होती.  8 मे रोजी इसिसच्या प्रमुखांमध्ये होणा-या बैठकीची जागा आणि वेळ माहिती करुन घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. त्यानंतर रात्री 12.30 ते 12.45 दरम्यान हवाई दलाने ज्या ठिकाणी बैठक सुरु होती त्या कमांड पॉईंटवर हवाई हल्ला केला", अशी माहिती मंत्रालयाने दिली होती. 

मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला इसीसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादी देखील उपस्थित होता. या हवाई हल्ल्यात तो ठार झाला आहे अशी माहिती होती. हल्ल्यात इसीसचे अनेकजण ठार झाले होते. जवळपास 30 फिल्ड कमांडर्स आणि 300 पर्सनल गार्ड ठार झाले असल्याचा दावा रशियन संरक्षण मंत्रालयाने केला होता.

टॅग्स :ISISइसिसInternationalआंतरराष्ट्रीय