शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
5
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
6
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
7
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
8
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
9
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
10
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
11
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
12
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
13
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
14
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
15
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
16
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
17
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
18
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

आयसिसचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीचा खात्मा, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2019 20:03 IST

अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम सुरू केली होती.

वॉशिंग्टन: 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया' अर्थात आयसिस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादी याला ठार करण्यात आले आहे. त्याच्यासोबत तीन मुले आणि इतर सहकाऱ्यांचा सुद्धा खात्मा करण्यात आला आहे. या वृत्ताला अअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. 

अबू बक्र अल-बगदादी याचा खात्मा करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान अमेरिकेने भूसुरुंगात अबू बक्र अल-बगदादी याला ठार केले आहे. याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, "काल रात्री अमेरिकेने जगातील पहिल्या क्रमांकाच्या दहशतवादी म्होरक्याला न्यायासमोर आणले. अबू बक्र अल-बगदादी ठार झाला आहे. जगातील सर्वात निर्दयी आणि हिंसक दहशतवादी संघटना असलेल्या आयसिसचा तो संस्थापक आणि म्होरक्या होता."

दरम्यान, एप्रिलमध्ये आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. पाच वर्षात प्रथमच आयसिसने अबू बक्र अल-बगदादीचा व्हिडीओ जारी केला होता. मात्र तो व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला, हे स्पष्ट होऊ शकले नव्हते. या व्हिडीओत त्यानं पूर्व सीरियातल्या आयसिसचा शेवटच्या बालेकिल्ला असलेल्या बागूजमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा उल्लेख केला होता.

बागूजमध्ये सुरू असलेला संघर्ष महिन्याभरापूर्वी संपला आहे. व्हिडीओत बगदादी तीन व्यक्तींना संबोधित करत होता. मात्र त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. गेल्या काही दिवसांत श्रीलंकेत दहशतवादी हल्ले झाले. त्यात आयसिसचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यांमध्ये ३०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर ५०० नागरिक गंभीर जखमी झाले. श्रीलंकेतल्या विविध शहरांमध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटांमध्ये चर्चना लक्ष्य करण्यात आले होते.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाterroristदहशतवादी