शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अपहृत भारतीय तंत्रज्ञाची सुदानमध्ये सुटका

By admin | Updated: June 13, 2014 18:28 IST

नवी दिल्ली : सुदानमध्ये तीन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेले भारतीय आयटी तंत्रज्ञ इरफान जाफरी यांची सुटका झाली असून ते सध्या सुदानी अधिकार्‍यांसोबत आहेत.

नवी दिल्ली : सुदानमध्ये तीन महिन्यांपूर्वी अपहरण करण्यात आलेले भारतीय आयटी तंत्रज्ञ इरफान जाफरी यांची सुटका झाली असून ते सध्या सुदानी अधिकार्‍यांसोबत आहेत.
अज्ञात बंदूकधार्‍यांनी त्यांचे अपहरण करून खंडणीची मागणी केली होती. इरफान यांची सुटका झाली असून ते शनिवारी खार्तूममध्ये दाखल होतील. आमचे पथक त्यांच्या संपर्कात आहे, असे टष्ट्वीट सुदानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी केले आहे. गुरुवारी जाफरी यांच्या कुटुंबियांनी संपूर्ण खंडणी देऊ केली होती. अपहरणकर्त्यांनी मागितलेली खंडणी देण्यास आम्ही तयार आहोत. माझ्यासाठी माझे पतीच सर्व काही आहेत. खंडणी न देण्याचे भारत व संयुक्त राष्ट्रसंघाचे धोरण आम्हाला मरणाच्या दारात लोटत आहे. माझे पती मोठ्या संकटात आहेत. या काळात आम्हाला एकटे सोडून दिले असल्याचे आम्हाला वाटत आहे. आम्हाला कोणीही मदत का करत नाही, असे इरफान यांची पत्नी नफिसा जाफरी यांनी सांगितले. त्यांचा गळा दाटून आला होता. गेल्या ११ मार्च रोजी पाच बंदूकधार्‍यांनी एका तुर्की उपाहारगृहापासून इरफान यांचे कथितरीत्या अपहरण केले. तेव्हापासून त्यांना दारफूरच्या आदिवासी भागात ओलिस ठेवण्यात आले होते. १२ मार्च रोजी आयटी कंपनीतून इरफान यांचे अपहरण झाल्याचा दूरध्वनी त्यांचे चुलते शकील अहमद यांना आला. या घटनेने कुटुंबीय हादरून गेले. इरफान हे ट्रायजिन टेक्नॉलॉजिस् लि. या बहुराष्ट्रीय कंपनीत गेल्या पाच वर्षांपासून काम करत आहेत. ही कंपनी संयुक्त राष्ट्रसंघासाठी काम करते. त्यामुळे इरफान यांच्या सुटकेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाने वाटाघाटीत सहभाग घेतला.