शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Dinosaur: अबब! घराच्या अंगणात सापडला ‘डायनासोर’, सांगाडा एकत्र आणि मूळ शारीरिक स्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 07:01 IST

Dinosaur: २०१७ मध्ये, पोर्तुगालमधील पोंबल येथे एका घरमालकाला त्याच्या घराच्या अंगणात बांधकाम सुरू असताना काही हाडे सापडली. मालकाने लगेचच संशोधन पथकाशी संपर्क साधला. तिथे उत्खनन सुरू झाले.

लिस्बन : २०१७ मध्ये, पोर्तुगालमधील पोंबल येथे एका घरमालकाला त्याच्या घराच्या अंगणात बांधकाम सुरू असताना काही हाडे सापडली. मालकाने लगेचच संशोधन पथकाशी संपर्क साधला. तिथे उत्खनन सुरू झाले. ऑगस्टमध्ये पोर्तुगीज व स्पॅनिश जीवाश्मशास्त्रज्ञांचे उत्खनन पूर्ण झाले आहे. सापडलेले अवशेष तब्बल ३९ फूट उंच आणि ८२ फूट लांब डायनासोरचे असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. युरोपमध्ये सापडलेला हा  सर्वात मोठा सॉरोपॉड असू  शकतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे. सॉरोपॉड हे शाकाहारी डायनासोर होते ज्यांना चार पाय आणि लांब मान व मोठी शेपटी होती.  अशाप्रकारे एखाद्या प्राण्याच्या सर्व फासळ्या एकत्र, तेही मूळ शारीरिक स्थितीत सापडणे ही सामान्य बाब नसल्याचे, लिस्बन विद्यापीठाचे संशोधक एलिझाबेथ मालाफिया यांनी सांगितले.  (वृत्तसंस्था) 

दक्षिण-पश्चिम चीनमधील एका रेस्टॉरंटच्या बाहेरील अंगणात सुमारे १० कोटी वर्षांपूर्वीच्या दोन सॉरोपॉड डायनासोरच्या पायाचे ठसे संशोधकांना सापडल्यानंतर अवघ्या एक महिन्यानंतर हे घडले आहे. सॉरोपॉड पृथ्वीवर सुमारे १५ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते, असा शास्त्रज्ञ मानतात. सोशल मीडियावर याबाबत बरीच चर्चा रंगली आहे.

टॅग्स :historyइतिहासInternationalआंतरराष्ट्रीय