शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांत अमेरिका-चीनमध्ये युद्ध पेटणार; युएस एअरफोर्स जनरलच्या मेमोने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2023 15:05 IST

जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये हे म्हटले आहे. त्यांचे विचार पेंटागॉनचा हेतू सांगत नसले तरी तैवानवरून चीन आणि अमेरिकेतील वाढता तणाव कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. 

अमेरिका आणि चीनमध्ये गेल्या काही वर्षांपासून तणावाचे वातावरण आहे. एकीकडे रशियाने युक्रेनवर हल्ला करून वर्ष होत नाही तोच अमेरिका आणि चीनमध्ये युद्धाचा भडका उडणार असल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. पुढील दोन वर्षांत अमेरिका आणि चीनमध्ये युद्ध होऊ शकते, अशी शक्यता अमेरिकेच्या फोर स्टार एअरफोर्स जनरलने व्यक्त केली आहे. 

जनरल माईक मिनिहन यांनी एअरफोर्सला लिहिलेल्या मेमोमध्ये हे म्हटले आहे. त्यांचे विचार पेंटागॉनचा हेतू सांगत नसले तरी तैवानवरून चीन आणि अमेरिकेतील वाढता तणाव कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. 

मला वाटते की आपण 2025 मध्ये चीनसोबत युद्ध करू. ही भीती चुकीची सिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे, परंतु अमेरिका आणि तैवान या दोन्ही देशांत २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होतील. त्यामुळे चीनकडून लष्करी कारवाई केली जाऊ शकते, असे मिनिहन यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या संरक्षण अधिकाऱ्याने यावर खुलासा करताना सांगितले की, ही टिप्पणी अमेरिकेची चीनबद्दलची विचारसरणी किंवा दृष्टिकोन दर्शवत नाही. 

अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले की, तैवान सामुद्रधुनीवर चीनच्या वाढत्या लष्करी हालचालींवरून चीनचे हेतू स्पष्टपणे दिसत आहेत. चीनने गेल्या काही वर्षांत तैवानवर राजनैतिक, लष्करी आणि आर्थिक दबावही वाढवला आहे. तैवानला शांतता हवी आहे, परंतू हल्ला झाल्यास त्याला प्रतिकार नक्कीच केला जाईल. 

टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीन