शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

जन्माला आले सात किलोचे सुपरसाइज बालक, दोन फूट उंची; डॉक्टर मंडळीही झाली हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 09:02 IST

ब्राझीलच्या ॲमेझॉनास या राज्यामध्ये एका महिलेने सुपरसाइज बालकाला जन्म दिला आहे. त्याचे वजन सात किलो असून, उंची दोन फूट आहे.

ब्रासिलिया :

ब्राझीलच्या ॲमेझॉनास या राज्यामध्ये एका महिलेने सुपरसाइज बालकाला जन्म दिला आहे. त्याचे वजन सात किलो असून, उंची दोन फूट आहे. या आगळ्या बालकाला पाहून डॉक्टर मंडळीही हैराण झाली. त्यांनी सिझेरिअनद्वारे हे बाळंतपण पार पाडले. आपल्या उभ्या आयुष्यात इतक्या मोठ्या आकाराचे तान्हे बालक प्रथमच पाहात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

नवजात अर्भकांचे वजन सात किलो कधीच असत नाही. मुलांचे वजन २.८ ते ३.२ किलो, तर मुलींचे वजन २.७ ते ३.१ किलो या दरम्यान असते. ब्राझीलमध्ये जन्मलेल्या सुपरसाइज बालकाचे नाव अँगरसन असे ठेवण्यात आले आहे.

१. बालकाचा जन्म १८ जानेवारी रोजी झाला. त्याची आई क्लेडिन सॅन्टोस २७ वर्षे वयाची आहे. गरोदर क्लेडिन नियमित तपासणीस आली असताना तिला प्रसूती वेदना सुरू झाल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. २. आपल्यापोटी सुपरसाइज बालक जन्माला आल्याची बातमी ऐकून तिलाही प्रथम आश्चर्याचा धक्का बसला होता. क्लेडिनला याआधी पाच मुले झाली आहेत. हे तिचे सहावे मूल आहे. 

नेटकऱ्यांकडून अभिनंदनतिने सांगितले की, माझ्या पोटी सात किलो वजन असलेला मुलगा जन्माला येईल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. अँगरसन याच्या बद्दलची माहिती सोशल मीडियावर झळकल्यानंतर नेटकऱ्यांनी क्लेडिनाचे अभिनंदन केले आहे. आगळ्या बालकाची आई होण्याचे भाग्य तुला लाभले आहे, अशी प्रतिक्रिया काही नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रिटन, इंडोनेशियातही अशी बालकेयाआधी २०१२ साली ब्रिटनमध्ये चेरल मिशेल या महिलेने सुमारे ७ किलो वजनाच्या बालकाला जन्म दिला होता. ब्रिटनमध्ये जन्मलेले ते तिसरे सुपरसाइज बालक आहे, तर चेरलचे हे चवथे अपत्य आहे. तिची याआधीची तीन मुले ही सर्वसाधारण वजनाची होती. २००९ मध्ये इंडोनेशियामध्ये एका महिलेला झालेल्या मुलाची उंची २ फूट व वजन सहा किलोपेक्षा अधिक होते.