शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

कडक उन्हामुळे अब्राहम लिंकन यांचा पुतळाही वितळला; अमेरिकेत उष्णतेचा प्रकोप; तापमान ४५ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 06:39 IST

सध्या भारतासह जगभरात उष्णतेच्या लाटा येत असून, यामुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

न्यूयॉर्क : सध्या भारतासह जगभरात उष्णतेच्या लाटा येत असून, यामुळे आतापर्यंत शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता वाढत्या उष्णतेमुळे पुतळेही वितळत असल्याचे समोर आले आहे. कडक उन्हामुळे वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचा सहा फूट उंच मेणाचा पुतळा वितळला आहे. अगदी काही वेळातच मूर्तीचे डोके वितळले आणि बाजूला पडले. लिंकन मेमोरिअलच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या या पुतळ्याचे डोके काढून टाकण्यात आले आणि पायही डोक्यापासून वेगळा करण्यात आला आहे. बुधवारपर्यंत दुसरा पायही उन्हामुळे वितळला आहे.

मूर्तीचे मोठे नुकसान कल्चरल डीसी या पुतळ्याची निर्मिती करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने सांगितले की, आमच्या कर्मचाऱ्यांनी लिंकन यांच्या पुतळ्यातील त्यांचे डोके पडू नये किंवा तुटू नये म्हणून बाजूला काढून ठेवले. तीन हजार पौंडांचा हा मेणाचा पुतळा मेणबत्तीप्रमाणे पेटवला जाणार आहे आणि कालांतराने त्यात बदल केला जाईल; परंतु अत्यंत उष्णतेमुळे या मूर्तीचे बरेच नुकसान झाले आहे. 

तापमानाचा विक्रम मोडला- अमेरिकेतील अनेक भागांत तापमानाचा विक्रम मोडीत निघाला आहे. अनेक भागांमध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअस आहे.- हवामान खात्याने मध्य आणि पूर्वेकडील भागांत राहणाऱ्या लोकांना या महिन्यातील तीव्र उष्णतेपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

कुठे बसवला होता पुतळा?- संस्थेने सांगितले की, लिंकन यांच्या पुतळ्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मेणाचा गोठणबिंदू -१४० अंश फॅरेनहाइट आहे. ४० एकर : कॅम्प बार्कर नावाचा हा पुतळा सप्टेंबरपर्यंत शाळेत ठेवण्यात येणार होता.- हा पुतळा गृहयुद्धातील निर्वासितांच्या इतिहासावर आधारित होती. निर्वासित शिबिरामध्ये पूर्वी गुलाम बनवलेले आणि मुक्त केलेले आफ्रिकन अमेरिकन राहत होते. - गॅरिसन एलिमेंटरी आता जिथे उभी आहे त्या जागेवर कॅम्प बार्करची स्थापना करण्यात आली. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे १६वे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेतील गुलामगिरी संपवण्याचे श्रेय लिंकन यांना दिले जाते.

टॅग्स :Americaअमेरिका