शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नेतन्याहू यांची पत्नी अन् PM मोदींच्या ड्रेसचं दिसलं खास कनेक्शन, काय म्हणाले पंतप्रधान? इस्रायल दौऱ्यातील 'त्या' क्षणांची जोरदार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 20:35 IST

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रोटोकॉल बाजूला सारून आपली पत्नी सारा नेतन्याहू यांच्यासह स्वतः विमानतळावर उपस्थित राहून मोदींचे स्वागत केले. यावरून उभय देशांतील दृढ संबंधांची प्रचिती येते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांनी बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रोटोकॉल बाजूला सारून आपली पत्नी सारा नेतन्याहू यांच्यासह स्वतः विमानतळावर उपस्थित राहून मोदींचे स्वागत केले. यावरून उभय देशांतील दृढ संबंधांची प्रचिती येते.

खास योगायोग -दरम्यान पंतप्रधानांच्या स्वागतावेळी एक गमतीशीर प्रसंग बघायला मिळाला. पंतप्रधान मोदींनी लावलेले 'पॉकेट स्क्वेअर' आणि सारा नेतन्याहू यांचा पोषाख यांचा रंग एकसारखा म्हणजेच (नारंगी अथवा भगवा) होता. ही बाब बेंजामिन नेतन्याहू यांच्या लक्षात येताच त्यांनी हसत त्याकडे दोघांचेही लक्ष वेधले. यावर पंतप्रधान मोदींनी त्वरित 'भगवा' असे उत्तर दिले. यावेळी तिघेही मोकळ्या मनाने हसले. 

सारा यांच्याकडून भारताचे आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक -यावेळी सारा नेतन्याहू यांनी भारताचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, "भारत हा एक अद्भुत देश आहे. जेथे विविधता आणि प्रगती दोन्हींचाही संगम आहे." याशिवाय, पंतप्रधान नेतन्याहू यांनी मोदींचा उल्लेख 'प्रिय मित्र' आणि 'जबरदस्त नेता' असा केला.

या मुद्द्यांवर होणार चर्चा - महत्वाचे म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान नेतन्याहू यांच्या निमंत्रण दिले आहे. आपल्या या दौऱ्यादरम्यान मोदी इस्रायली संसदेलाही (नेसेट) संबोधित करतील. याशिवाय, ते राष्ट्राध्यक्ष इसहाक हर्जोग यांची भेट घेतील, तसेच 'यद वाशेम' या होलोकॉस्ट स्मारकालाही भेट देतील. या ऐतिहासिक भेटीमध्ये संरक्षण, व्यापार, सायबर सुरक्षा आणि स्टार्टअप सहकार्य यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Netanyahu's wife, PM Modi's dress share connection: Israel visit buzz.

Web Summary : PM Modi's Israel visit saw a light moment as his pocket square matched Sara Netanyahu's outfit. She praised India, calling it diverse and progressive. Discussions on defense, trade, and cyber security are planned.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBenjamin netanyahuबेंजामिन नेतन्याहूIsraelइस्रायल