मागील ९ महिन्यापासून अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर अंतराळात अडकली आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे ८ दिवसात परतणाऱ्या सुनीता विलियम्स यांना ९ महिने अंतराळातच घालवावे लागले परंतु आता दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. नासा आणि स्पेसएक्सचं क्रू १० मिशन अंतराळ स्थानकात पोहचलं आहे. सुनीता आणि बुच यांना हे यान पुन्हा पृथ्वीवर घेऊन येणार आहे. नासा आणि स्पेसएक्सचं यान अंतराळात पोहचल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले आहेत.
अंतराळात सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आणण्यासाठी फाल्कन ९ रॉकेटच्या माध्यमातून क्रू १० मिशन ड्रॅगन स्पेसक्राफ्ट अंतराळात पोहचले आहे. या यानातून अंतराळात गेलेले अंतराळवीर यांनी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची भेट घेतली. पृथ्वीवर परत नेण्यासाठी पोहचलेल्या अंतराळ यानातून उतरलेल्या इतरांना पाहून सुनीता आणि बुच यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता. हे दोघेही त्यांच्या इतर अंतराळ सहकाऱ्यांना पाहून खुश झाले आणि गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांनी डान्स केला, जल्लोष केला.
नासाचं अंतराळवीरांना घेऊन गेलेले फाल्कन ९ रॉकेट सकाळी ९.४० मिनिटांनी अंतराळ स्थानकात पोहचले. अंतराळात जाणाऱ्या सदस्यांपैकी अमेरिकेचे २ अंतराळवीर एक मॉक्कलेन आणि निकोल आयर्स आहेत. त्याशिवाय जपानचे तुकुया ओनिशी आणि रशियाचे किरिल पेस्कोव हेदेखील आहेत.
आठवडाभरात पृथ्वीवर पोहचण्याची अपेक्षा
क्रू १० सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांच्याकडे पोहचले आहेत परंतु आता काही दिवस ते अंतराळ स्थानकात काही माहिती जमा करतील. त्यानंतर आठवडाभरात सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर स्पेस एक्स कॅप्सूलच्या माध्यमातून इतर सहकाऱ्यांसोबत पृथ्वीवर परतण्याची अपेक्षा आहे. जर वातावरण ठीक असेल तर स्पेस कॅप्सूल बुधवारी १९ मार्च आधीच स्पेस स्टेशनहून फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर लँड करेल.
सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर ही अंतराळ वीरांची जोडी नासा तर्फे ५ जून २०२३ रोजी स्पेस स्टेशनला गेली होती. त्यानंतर अनेक अडचणींचा दोघांना सामना करावा लागला. त्यांना स्ट्रँण्डेड अंतराळवीर असेही संबोधले गेले. स्ट्रँण्डेड अंतराळवीर म्हणजे अंतराळात अडकलेले. काही तांत्रिक अडचणी आल्याने त्यांना परत पृथ्वीवर आणणे शक्य नाही असे अंतराळवीर...या ९ महिन्याच्या कालावधीत सुनीता यांनी अंतराळात भाज्यांचे पीक घेण्याचा प्रयोग केला. अंतराळातही लागवड करता येते. लेट्यूस या वनस्पतीचे निरिक्षण केले. त्यांनी हा प्रयोग अंतराळात असताना वीरांना ताजे अन्न मिळावे म्हणून केला आहे. या प्रयोगाला प्लांट हॅबिटॅट-०७ असे नाव दिले. अंतराळात वाढवलेल्या वनस्पतीमध्येही पोषकतत्व असतात आणि खाण्यासाठी उत्तम असतात. हे सिद्ध करण्यासाठी तसेच अनेक कारणांसाठी हा प्रयोग केला गेला.