शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
4
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
5
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
6
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
7
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
8
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
9
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
10
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
11
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
12
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
13
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
14
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
15
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
17
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
18
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
19
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
20
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच

"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 18:32 IST

'जर अमेरिकेने खबरदारी घेतली नाही तर त्यांना कोविडपेक्षाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो', असा इशारा वरिष्ठ अमेरिकन तज्ज्ञाने चीनबद्दल दिला.

Corona :  २०२० मध्ये कोरोनाने जगभरात गोंधळ उडाला होता. कोरोनाने अमेरिकेचे मोठे नुकसान झाले होते. सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर होते, आताही ट्रम्प सत्तेवर आहेत.  २०२० मध्ये ट्रम्प यांनी कोरोनासाठी चीनच्या वुहान शहरातील गुप्त प्रयोगशाळेला जबाबदार धरले होते. ट्रम्प यांनी अनेक वेळा कोरोना विषाणूचे वर्णन चिनी विषाणू म्हणून केले आहे. आता पुन्हा एकदा एक नवीन संकट उभे ठाकले आहे.

भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?

चीन प्रकरणांवरील अमेरिकेचे वरिष्ठ तज्ज्ञ गॉर्डन चांग यांनी चीनबद्दल गंभीर इशारा दिला आहे. ते म्हणाले की, जर अमेरिकेने खबरदारी घेतली नाही तर त्याला "कोविडपेक्षा मोठा धोका" येऊ शकतो. हे विधान दोन चिनी शास्त्रज्ञांवर अमेरिकेत विषारी बुरशीची तस्करी केल्याचा आरोप झाल्यानंतर आले आहे.

मोठे नुकसान होऊ शकते

३३ वर्षीय युनकिंग जियान आणि तिचा प्रियकर जुन्योंग लिऊ (३४) यांच्यावर अमेरिकेत फ्युसेरियम ग्रॅमिनेरम (Fusarium graminearum) नावाच्या बुरशीची तस्करी करण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. या बुरशीमुळे गहू, बार्ली, मका आणि तांदळात "हेड ब्लाइट" नावाचा आजार होतो आणि तो कृषी-दहशतवादाचे संभाव्य शस्त्र मानला जातो. यामुळे उलटी, यकृताचे नुकसान आणि मानव आणि प्राण्यांमध्ये प्रजनन क्षमतेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांनी इशारा दिला

गॉर्डन चांग यांनी फॉक्स न्यूजला सांगितले की, ही बुरशीची तस्करी "अमेरिकेविरुद्धच्या युद्धासारखी" आहे. जर अमेरिकेने चीनशी संबंध तोडले नाहीत तर त्यांना कोविड आणि फेंटानिलपेक्षाही वाईट हल्ल्याला सामोरे जावे लागू शकते. त्यांनी २०२० च्या घटनेची आठवणही करून दिली, त्यावेळी चीनमधून बियाण्यांची एक खेप अमेरिकेच्या सर्व ५० राज्यांमध्ये पाठवण्यात आली होती . याचे वर्णन त्यांनी जैविक हल्ल्याचा प्रयत्न म्हणून केला.

चांग म्हणाले, "आपण चीनपेक्षा बलवान असलो तरी आपण त्यांच्याकडून हरू शकतो, कारण आपण पूर्ण ताकदीने आणि दृढनिश्चयाने स्वतःचा बचाव करत नाही आहोत." ते म्हणाले, चीनची कम्युनिस्ट राजवट अमेरिकेला शत्रू मानून 'जनयुद्धा'च्या मानसिकतेने काम करत आहे आणि अमेरिकेला आता कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाchinaचीन