शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कच्च्या तेलाच्या घसरणीचा थेट फायदा! पाकिस्तानने पेट्रोल 12, डिझेल 30 रुपयांनी कमी केले, तिजोरी रिकामी झाली तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:43 IST

कच्च्या तेलाची किंमत घसरली! पाकिस्तानने पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले, जनतेला थेट दिलासा

पाकिस्तानमध्ये राजकीय संकट आणि आर्थिक संकट उभे ठाकलेले असताना तसेच तिजोरी खाली असताना इंधनाच्या दरात मोठी कपात करण्यात आली आहे. महागाईमध्ये होरपळून गेलेल्या पाकिस्तानी जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. पेट्रोलच्या दरात १२ रुपयांची तर डिझेलच्या दरात ३० रुपयांची कपात करण्यात आली आहे. 

या किंमती पुढीसल १५ दिवसांसाठी वैध असणार आहेत. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक डार यांनी सोमवारी याची घोषणा केली. सोमवारी त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित केला. यामध्ये शाहबाज शरीफ सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलांच्या किंमती कमी झाल्या आहेत, त्याचा फायदा जनतेला देण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले. तसेच आज रात्रीपासून १२ वाजल्यानंतर पुढील १५ दिवसांसाठी पेट्रोल १२ रुपये आणि डिझेल ३० रुपयांनी कमी केले जात आहे, अशी घोषणा केली.

या नव्या दरांनुसार पेट्रोल २७० रुपये प्रति लीटर झाले आहे. तर डिझेलची किंमत 258 रुपये झाली आहे. रॉकेलमध्ये देखील १२ रुपयांची कपात करण्यात आली आहे. ती आता 164.07 रुपये असणार आहे. तर हलके डिझेलची किंमत १२ रुपयांनी कमी होऊन 152.68 रुपये प्रति लीटर झाली आहे. 

इंधनाच्या विक्रीत मोठी घटपाकिस्तानात इंधनाचे दर चढे आहेत. आधीच आर्थिक संकटामुळे तेथील लोकांची परिस्थिती बिघडलेली आहे. असे असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इंधनाची विक्री ४७ टक्क्यांनी कमी होऊन 1.171 दशलक्ष टनांवर आली आहे. गेल्या वर्षीच्या विक्रीतही २४ टक्क्यांची घट झाली होती. 

पाकिस्तानची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे आणि ते मदतीसाठी हाका मारत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडे 2019 मध्ये केलेल्या बेलआउट पॅकेज कराराचा पहिला $ 1.1 अब्ज हप्ता जारी करण्याची सतत मागणी करत आहे. मात्र अद्यापपर्यंत आयएमएफने त्याला मान्यता दिलेली नाही.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानPetrolपेट्रोल