शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

‘८६४७’ने कॉमी यांना घेरले, सिक्रेट सर्व्हिसकडून चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 13:27 IST

कॉमी यांनी पोस्ट डिलीट करीत याला कोणताही राजकीय संदर्भ नव्हता, असे जाहीरपणे सांगितले होते.

वॉशिंग्टन : शिंपल्यांनी तयार केलेल्या ‘८६४७’ संख्येच्या आकृतीचे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट करून वाद ओढवून घेणारे एफबीआयचे माजी संचालक जेम्स कॉमी यांची ‘सिक्रिट सर्व्हिस’ने कसून चौकशी केली. ही पोस्ट म्हणजे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येच्या कटाचा भाग असल्याचा आरोप रिपब्लिकन्सनी केला होता.

कॉमी यांनी पोस्ट डिलीट करीत याला कोणताही राजकीय संदर्भ नव्हता, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र, अमेरिकी परंपरेतील ‘८६’चा अर्थ लावून कॉमी यांच्यावर गंभीर आरोप झाले आणि त्यांची कसून चौकशी केली जात आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी असलेल्या होमलँड सेक्युरिटी सेक्रेटरी किस्ती नोएम यांनीही कॉमी यांची चौकशी झाल्याची पुष्टी केली.

घटनाक्रम असाएफबीआयचे माजी संचालक जेम्स कॉमी यांनी १५ मे रोजी पोस्ट केली.‘समुद्रकिनारी फिरताना शिंपल्यांचे एक शिल्प’ असे लिहून कॉमी यांनी ‘८६४७’ संख्येची आकृती पोस्ट केली.

यावरून वाद पेटण्याची चिन्हे दिसताच त्यांनी काही वेळताच ही पोस्ट डिलीट केली; पण यावरून निर्माण झालेला संशयकल्लोळ सुरूच राहिला.आता सिक्रिट सर्व्हिसने त्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.

...म्हणून गंभीर दखलअमेरिकी परंपरेत ८६ या संख्येचा अर्थ ‘काढून टाकणे’ किंवा ‘फेकून देणे’ असा लावला जातो. तर ४७ ही संख्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांशी जोडली आहे.ट्रम्प या देशाचे ४७वे राष्ट्राध्यक्ष आहेत. हे अर्थ लावून कॉमींच्या पोस्टची गंभीर दखल घेण्यात आली.

टॅग्स :Americaअमेरिका