शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
2
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
3
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
4
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान
5
Rishabh Pant Captain : पंत टीम इंडियाचा कॅप्टन! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी ऋतुराजलाही संधी
6
'स्वत:ला सरकार समजू नका'; मेधा कुलकर्णींच्या 'शुद्धीकरणा'मुळे महायुतीत फूट; मित्रपक्षांकडून 'धार्मिक तेढ' वाढवल्याचा आरोप
7
Ashwin Amavasya 2025:अमावस्या तिथीला अमावस्याच का म्हणतात? वाचा ही रहस्य उलगडणारी कथा
8
जपानच्या संसदेचा ऐतिहासिक निर्णय! सनाई ताकाईची बनल्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान
9
वीरेंद्र सेहवागच्या 'फॅमिली फोटो'तून पत्नी आरती गायब; नात्यात दुराव्याच्या चर्चांना खतपाणी
10
टोयोटाची 'बेबी लँड क्रूझर'! जिम्नी नाही बरं का...! डिझाइन, रग्ड फीचर्स आणि ऑफ-रोडिंग क्षमता आली समोर
11
हा खेळाडू मला संघात नकोय...! सूर्यकुमार - गंभीर यांच्यात आशिया कपआधी कुणावरून झालेला वाद?
12
पाकिस्तान-अफगाणिस्तान शस्त्रसंधी संकटात! एका ओळीवर अवलंबून, पाक संरक्षण मंत्र्यांचं मोठं विधान
13
IND vs AUS : दिवाळीच्या शुभेच्छा! विमानतळावर विराट-रोहितची चाहत्यांसोबत सेल्फी अन् बरंच काही (VIDEO)
14
सासरा-सूनेच्या अफेअरला सासूची मदत; माजी पोलीस महासंचालकाने केली मुलाची हत्या, पंजाब हादरले!
15
Top Test Wicket Taker List In 2025 : ...अन् टेस्टमध्ये DSP सिराजपेक्षा बेस्ट ठरला झिम्बाब्वेचा गडी!
16
हळद लागली! ऐन दिवाळीत नोरा फतेहीची लगीनघाई? कोरियन अभिनेत्यासोबत हळदीचे फोटो झाले व्हायरल
17
Muhurat Trading: शेअर बाजारात आज फक्त १ तास! जाणून घ्या 'मुहूर्त ट्रेडिंग'ची अचूक वेळ 
18
आई झाल्यानंतर पहिल्यांदाच दिसली कियारा अडवाणी, दिवाळीनिमित्त शेअर केला क्युट व्हिडीओ
19
बुद्धिबळ जगताला मोठा धक्का! अमेरिकेचा 'ग्रँडमास्टर' डॅनियल नरोडित्स्की याचे २९ व्या वर्षी निधन
20
Ashwin Amavasya 2025: दिवाळीच्या आनंदात ठेवा पितरांचे स्मरण; त्यांचे नावे पणती लावून करा दीप प्रज्वलन!

Corona : स्‍पेनमध्ये 24 तासांत 812 जणांचा मृत्यू, "दोन आठवड्यात सर्वाधिक होऊ शकतो अमेरिकेचा मृत्यूदर"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 19:11 IST

आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000पर्यंत रोखली गेली. याच बरोबर, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देइटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे गेल्या 24 तासांत 756 जणांचा मृत्यू  ट्रम्प म्हणाले पुढील दोन आठवडे आव्हानात्मक चीनने मदत म्हणून युरोपीय देशांना पाठवलेले वैद्यकीय साहित्य निकृष्ट दर्जाचे

माद्रिद/वॉशिंग्टन : कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला मगरमिठी मारली आहे. याचा सामना करताना बडे-बडे देशही हतबल होत आहेत. स्‍पेनमध्ये गेल्या 24 तासांत 812 जणांचा मृत्यू झाला. येथील मृतांचा आकडा आता 7,340वर पोहोचला आहे. यातच, अमेरिकेत पुढील दोन दिवसांत मृत्यू दर सर्वाधिक होऊ शकतो, अशी शक्यता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.  जगभरातील कोरोना बाधितांची संख्या आता तब्बल 720,000वर जाऊन पोहोचली आहे. यापैकी 33,969 जणांचा त्याने बळी घेतला आहे. अमेरिकेत आतापर्यंत तब्बल 143,025 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर 2,509 जणांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये कोरोना व्हायरसमुळे गेल्या 24 तासांत 756 जणांचा मृत्यू झाला. येथील मृतांचा आकडा आता 10,779वर जाऊन पोहोचला आहे.

पुढील दोन आठवडे आव्हानात्मक - ट्रम्प  अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी कोरोनामुळे तब्बल एक ते दो लाख लोकांचा मृत्यू होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, सोशल डिस्टंसिंग शिवाय मृत्यू दर 2.2 मिलियनपर्यंत पोहोचू शकत होता. यामुळे सिद्ध झाले आहे, की आम्ही अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. यामुळेच संक्रमित लोकांची संख्या 100,000 ते 200,000 पर्यंत रोखली गेली, असे म्हटले आहे. मात्र याच बरोबर त्यांनी, अमेरिकेत पुढील दोन आठवड्यांत कोरोना व्हायरसमुळे मरणारांची संख्या सर्वाधिक होऊ शकते, असेही म्हटले आहे. यामुळेच त्यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घातलेले नियम 30 एप्रिलपर्यंत वाढवले आहेत.

मॉस्‍को बंद -इटलीनंतर कोरोनाचा सर्वाधिक फटका स्पेनला बसला आहे. रविवारीदेखील येथे एकाच दिवसात 838 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर रशियाने राजधानी मॉस्कोमध्ये सोमवारी बंदची घोषणा केली. मात्र, आवश्यक सेवा पुरवणाऱ्यांना बाहेर निघण्याची परवानगी देण्यात आली आहे. येथे 1,534 जणांना  कोरोनाची लागण झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

चीनने मदत म्हणून पाठवलेली कोरोना टेस्टिंग किट निकृष्ट -चीनमधून उगम पावलेला कोरोना विषाणू सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, कोरोनामधून सावरल्यानंतर चीनने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या इतर देशांना मदत करण्यास सुरुवात केली आहे. मात्र चीनचे हे औदार्य भेसळयुक्त असल्याचे समोर येऊ लागले आहे. कोरोनामुळे आरोग्यसेवेचे कंबरडे मोडलेल्या युरोपमधील अनेक देशांना चीनने पाठवलेले टेस्टिंग किट्स निकृष्ट दर्जाच्या असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चीनच्या मदतीमागील हेतुबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे. 

चीनने पाठवलेले टेस्टिंग किट हे सदोष असल्याचे समोर आल्यानंतर स्पेन आणि झेक प्रजासत्ताक या देशांनी चिनी टेस्टिंग किटचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाUnited StatesअमेरिकाItalyइटलीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पrussiaरशियाchinaचीन