शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेमध्ये ८ लाख सरकारी कर्मचाऱ्यांना कामच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 06:17 IST

सलग २४ वा दिवस; डेमोक्रॅटस्मुळेच सरकार ठप्प -ट्रम्प

लॉस एंजिलीस/वॉशिंग्टन : सरकारचे कामकाज अंशत: बंद पडल्याचा ठपका अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विरोधी पक्ष डेमोक्रॅटिक पक्षावर ठेवला आहे. अमेरिका-मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी ५.७ अब्ज डॉलरची मागणी करणारा ट्रम्प यांचा प्रस्ताव काँग्रेसमध्ये विरोधकांनी अडवून ठेवला आहे. अमेरिकेत अंशत: बंदचा हा २४ वा दिवस आहे.

ट्रम्प यांनी सोमवारी म्हटले की, अमेरिकन नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर मी पाऊल मागे घेणार नाही. या अंशत: बंदमुळे महत्त्वाच्या विभागांच्या आठ लाखांपेक्षा जास्त सरकारी कर्मचाºयांकडे काम नाही.लुइसियानात शेतकरी मेळाव्यात बोलताना ट्रम्प म्हणाले की, ‘‘सरकार फक्त एका कारणामुळे बंद आहे... डेमोक्रॅटिक पक्ष सीमा सुरक्षा, आमची सुरक्षा, आमच्या देशाच्या सुरक्षेसाठी पैसे देत नाही.’’

ट्रम्प यांनी मेक्सिको सीमेवर गेल्या आठवड्यात केलेल्या दौºयाचा उल्लेख करून सांगितले की, दक्षिण सीमेवरून बेकायदेशीर विदेशी हे फक्त मेक्सिकोतूनच नव्हे, तर इतर देशांतूनही येत आहेत. १५० लोक बेकायदेशीरीत्या सीमेवरून अमेरिकेत आले होते. त्यात तीन लोक हे पाकिस्तानातून, चार मध्य पूर्वेतून आले होते. चीनमधून, तसेच संपूर्ण जगातून लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत येतात, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेला सुरक्षित ठेवण्यासाठी जे उपाय आवश्यक आहेत त्याला डेमोक्रॅटस् मान्यता देणार नाहीत, असा आरोप त्यांनी केला.यादरम्यान, वाहतूक सुरक्षा प्रशासनाने सांगितले की, विमानतळावर अनेक सुरक्षा स्क्रीनर रविवारी आणि सोमवारी कामावर आले नाहीत. राष्ट्रीय अनुपस्थिती दर गेल्या वर्षी याच दिवशी ३.२ टक्क्यांच्या तुलनेत ७.६ टक्केहोता. (वृत्तसंस्था)३० हजार शिक्षक संपावरसमाधानकारक वेतन, वर्गात मर्यादित विद्यार्थिसंख्या आणि जास्त शिक्षकांची भरती करावी या मागण्यांसाठी येथील सरकारी शाळांतील ३० हजारांपेक्षा जास्त शिक्षक सोमवारी संपावर गेले.गेल्या ३० वर्षांत शिक्षकांनी केलेला हा पहिला संप आहे. शाळांच्या संख्येबाबत देशात लॉस एंजिलिस दुसरा सगळ्यात मोठा जिल्हा आहे. या संपाचा फटका जवळपास ५० हजार विद्यार्थ्यांना बसला आहे. गेल्या आठवड्यात शिक्षकांसोबतची चर्चा निष्फळ ठरली आहे.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प