शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

Yemen : मोठी दुर्घटना, येमेनमध्ये चेंगराचेंगरीत 85 जणांचा मृत्यू तर 100 हून अधिक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 08:50 IST

या कार्यक्रमासाठी गर्दी प्रचंड झाली होती. त्यामुळे जमावाला नियंत्रित करण्यासाठी सशस्त्र हुती बंडखोरांनी हवेत गोळीबार केला.

येमेन : येमेनची राजधानी साना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत 85 लोकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत 300 हून जण गंभीर जखमी झाले आहे. हुथी बंडखोरांच्या अधिकृत माध्यमांनी गुरुवारी ही माहिती दिली.

येमेनमधील इराण-समर्थित हुथी चळवळीद्वारे चालवल्या जाणार्‍या मुख्य टेलिव्हिजन न्यूज आउटलेट अल मसिराह टीव्हीने साना येथील आरोग्य संचालकांचा हवाला देऊन सांगितले की, मृतांव्यतिरिक्त अनेक लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी 13 जणांची प्रकृती गंभीर आहे. हुथी-नियंत्रित अंतर्गत मंत्रालयाच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम पवित्र रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवसांत व्यापाऱ्यांद्वारे आर्थिक मदत करताना चेंगराचेंगरी झाली. 

वृत्तसंस्था रॉयटर्सने बचाव कार्यात सहभागी असलेल्या दोन प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, ही आर्थिक मदत करण्यासाठी एका शाळेत शेकडो लोक जमले होते. येथे प्रत्येक व्यक्तीला 5,000 येमेनी रियाल किंवा भारतीय चलनात सुमारे 1500 रुपये मिळणार होते. दरम्यान, या घटनेनंतर ज्या शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ती शाळा तात्काळ बंद करण्यात आली आहे. पत्रकारांना या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. 

याचबरोबर, या कार्यक्रमासाठी गर्दी प्रचंड झाली होती. त्यामुळे जमावाला नियंत्रित करण्यासाठी सशस्त्र हुती बंडखोरांनी हवेत गोळीबार केला. त्यावेळी गोळी एका विजेच्या तारेला लागली. त्यामुळे स्फोट झाला. या घटनेमुळे लोक घाबरले. त्यांच्यात दहशत निर्माण झाली आणि एकच पळापळ सुरू झाली. त्यामुळे ही घटना घडल्याचे, प्रत्यक्षदर्शी अब्देल रहमान अहमद यांनी सांगितले.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय