शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

जपानवरील अणुबॉम्ब हल्याला ७१ वर्षे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2016 05:28 IST

हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यात सुमारे १ लाख ४० हजार नागरिक ठार झाले होते. ९ ऑगस्ट रोजी नागासाकी वर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ९ : दुसऱ्या महायुद्धात जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावर विध्वासंक अणुबॉम्ब टाकले होते यामध्ये अनेक निरापराध लोकांचे बळी गेले होते. हिरोशिमा शहरावर ६ ऑगस्ट १९४५ रोजी अमेरिकेने पहिला अणुबॉम्ब टाकला होता. त्यात सुमारे १ लाख ४० हजार नागरिक ठार झाले होते. ९ ऑगस्ट रोजी नागासाकी वर दुसरा अणुबॉम्ब टाकला होता. कित्येक जण त्या अणुबॉम्बच्या स्फोटामुळे निर्माण झालेल्या आगीत ठार झाले. नंतर कितीतरी जखमी आणि स्फोटामुळे निर्माण झालेल्या किरणोत्सर्गाने आजारी पडून आठवड्यात, महिन्यात आणि वर्षात मरण पावले. तीन दिवसांनंतर नागासाकी शहरावर अमेरिकेने दुसरा अणुबॉम्ब टाकला, त्यात ७४ हजार लोक ठार झाले होते. जर्मन फौजांनी पोलंडवर १९३९ मध्ये हल्ला केल्यामुळे सुरू झालेले दुसरे जागतिक युद्ध हिटलरच्या आत्महत्येबरोबर ३० एप्रिल १९४५ रोजी संपल्यात जमा होते. मात्र आठवडाभरात ७ मे रोजी जर्मनीने शरणागती पत्करली आणि युरोपमधील दुसरे महायुद्ध संपले. कमकुवत झालेल्या जपानची शरणागती तेवढी बाकी होती. मात्र, रशियाने जपानविरुद्ध युद्ध जाहीर करण्याआधी दोन दिवस म्हणजे ६ ऑगस्ट रोजी अमेरिकेने हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब हल्ला केला. त्यानंतर दुसरा अणुबॉम्ब हल्ला ९ ऑगस्ट रोजी नागासाकीवर केला होता .लास अ‍ॅलोमास - विध्वंस जन्माला घालणारं गाव!

मेरिका, कॅनडा आणि इंग्लंडनं मिळून हाती घेतलेलं अणुबॉम्ब तयार करण्याचं मिशन. त्याला अमेरिकेनं 'मॅनहॅटन प्रोजेक्ट' असं नाव दिलं. लाखभर संशोधकांना हातीशी धरून अमेरिकेनं दोन अणुबॉम्ब तयार केलं. छोट्या बॉम्बचं नाव होतं 'लिटिल बॉय' अन् मोठ्या बॉम्बचं नाव होतं 'फॅट मॅन'. 'लिटिल बॉय' तयार झाल्यानंतर ६ ऑगस्ट १९४५ च्या सकाळी सव्वा आठच्या सुमारास हिरोशिमावर टाकला गेला. त्यानंतर तीनच दिवसांनी ९ ऑगस्ट १९४५ च्या भल्या पहाटे ३ वाजून ४६ मिनिटांनी नागासाकी शहरावर अमेरिकेनं 'फॅट मॅन' नावाचा अणुबॉम्ब टाकला. या दोन्ही महाभयंकर स्फोटांनी जपानमध्ये विध्वंस घडविला. तब्बल ३ लाखांहून अधिक बळी घेतले. अणुबॉम्बचा स्फोट होऊन ज्वाळा उसळल्या. जमीन ४ हजार अंश सेल्सिअसपर्यंत तापली. या स्फोटात १ लाख ४० हजार लोक मरण पावले. जे वाचले तेही नंतरच्या काळात किरणोत्साराने मृत्यू पावले.