शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

सौदीमध्ये तुरुंगात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 02:52 IST

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी राखली भारताची प्रतिष्ठा; प्रवास, भोजन आदी सुविधांसाठी केली प्रयत्नांची शर्थ

मुंबई : ‘संकटात मदतीला धावतो तोच खरा मित्र’, या म्हणीचा प्रत्यय आणून देणारी कामगिरी बजावली आहे मसालाकिंग डॉ. धनंजय दातार आणि त्यांच्या दुबईस्थित ‘अल अदील ट्रेडिंग’ समूहाने. सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात कोरोनानंतर लॉकडाऊनमुळे चार महिने तुरुंगात अडकलेल्या ७०० भारतीय कामगारांची सुटका, प्रवासखर्च आणि त्यांच्या भोजनाची व्यवस्था यासाठी डॉ. दातार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ केली आणि भारताची प्रतिष्ठाही राखली. मुक्त झालेले हे कामगार नुकतेच मायदेशी परतले तेव्हा त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले आणि त्यांनी डॉ. दातार हे खरोखरच ‘अल अदील’ (भला माणूस) आहेत, या शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली.

काही कामगारांच्या व्हिसाची मुदत संपली होती. नोकºया गमावल्याने मिळेल ते काम करत होते. काही अक्षरश: भीक मागत होते. या गोष्टी कायद्याला धरून नसल्याने सौदी पोलिसांनी त्यांची रवानगी स्थानबद्धता केंद्रात केली होती. डॉ. दातार यांनी दुबईतील भारतीय वाणिज्य दूतावासामार्फत जेद्दाहमधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्क साधला आणि कामगारांना भारतात नेण्याचा पूर्ण खर्च उचलण्याची तयारी दाखवली. सौदी प्रशासनाचे सहकार्य, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाचे प्रयत्न आणि डॉ. दातार यांनी चिकाटीने केलेला पाठपुरावा यामुळे हे कामगार नुकतेच मुक्त झाले. सौदी प्रशासनाने आणखी सहकार्य करीत या सर्व कामगारांना ‘सौदिया एअरलाइन्स’ने भारतात पाठविले. कामगारांचा जेद्दाह विमानतळापर्यंतचा प्रवास, वैद्यकीय तपासणी व भोजनाची जबाबदारी डॉ. दातार यांच्या सहकाऱ्यांनी सांभाळली. ४५१ कामगार २ विमानांनी दिल्ली विमानतळावर, तर उर्वरित २५० कामगार कोची विमानतळावर उतरले. दिल्लीत उतरलेल्या कामगारांना दिल्ली व भटिंडा येथे क्वारंटाईन करण्यात आले.

5000 गरजूंना आतापर्यंत आमच्या ‘अल अदील’ समूहाच्या कंपनीने सामाजिक जबाबदारी उपक्रमांतर्गत हे साह्य देऊन भारतात रवाना केले आहे. मी व्यवसायाबरोबरच आखाती देशांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रसार व प्रचार यातही सक्रिय आहे. खरे तर मी विशेष काही केलेले नाही. कारण, संकटाच्या काळात आपल्या बांधवांची मदत करणे हा माणुसकीचा व भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे.700 भारतीय कामगार सौदी अरेबियात तुरूंगात अडकून पडले असून, ते असाह्य आहेत, हे समजताच मी अस्वस्थ झालो आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा निश्चय केला. सर्वांच्या सहकार्यामुळे आता हे कामगार मुक्त झाले असून भारतात पोहोचून आपल्या कुटुंबियांसमवेत समाधानी व सुरक्षित राहतील, याचाच मला खूप आनंद आहे. 

टॅग्स :Labourकामगारcorona virusकोरोना वायरस बातम्या