शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

लायकाच्या प्रवासाची 60 वर्षे; अंतराळात जाणारा पहिला प्राणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 16:21 IST

अंतराळामध्ये जाणारा पहिला जिवंत प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लायकाला अंतराळात पाठवून 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. अंतराळविज्ञानात वेगाने झेप घेणाऱ्या रशियामध्ये लायका या श्वानाला स्पुटनिक-2 या यानामधून पाठविण्यात आले होते.

ठळक मुद्दे3 नोव्हेंबर 1957 रोजी लायकाला स्पुटनिकमधून पाठविण्यात आले होते. तिला यानामध्ये बसवून पाठविल्यानंतर काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला होता.

मॉस्को- अंतराळामध्ये जाणारा पहिला जिवंत प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लायकाला अंतराळात पाठवून 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. अंतराळविज्ञानात वेगाने झेप घेणाऱ्या रशियामध्ये लायका या श्वानाला स्पुटनिक-2 या यानामधून पाठविण्यात आले होते. 3 नोव्हेंबर 1957 रोजी लायकाला स्पुटनिकमधून पाठविण्यात आले होते. तिला यानामध्ये बसवून पाठविल्यानंतर काही तासांमध्येच तिचा मृत्यू झाला होता. रशियाचे तत्कालिन सर्वेसर्वा निकिटा ख्रुश्चेव्ह यांनी अंतराळविज्ञानाच्या प्रगतीसाठी विशेष प्रयत्न केले होते.लायकाला शोधणाऱ्या आदिल्या कोतोवस्काया यांनी असोसिएटेड प्रेसशी बोलताना सांगितले,  "अंतराळ मोहिमेत पाठविण्यासाठी रशियामधील रस्त्यांवर कुत्र्यांचा शोध घेण्यात आला होता. त्यामध्ये लायकाने सर्व निकष पूर्ण केले त्यामुळेच तिची या मोहिमेसाठी निवड करण्यात आली होती. फोटोजेनिक, विनम्र आणि युक्तीबाज अशा या श्वानाची तात्काळ निवड करण्यात आली." आपल्या मृत्यूची जाणिव झाल्यासारखी ती फोटोत गोंधळल्यासारखी दिसायची असे सांगत 90 वर्षिय आदिल्या म्हणाल्या," स्पुटनिकमध्ये बसवून पाठविण्यापुर्वी मी अत्यंत भावनिक झाले होते. मी तिला आम्हाला माफ कर असे सांगितले आणि रडले होते." लायका अंतराळात गेल्यावर एक दिवसही जगू शकली नव्हती. काही तासच ती स्पुटनिकमध्ये जिवंत राहिली. मात्र सूर्यकिरणांपासून वाचण्यासाठी योग्य अशी सुविधा या यानामध्ये करण्यात आली होती. त्यामुळे तापमान प्रमाणाबाहेर वाढून लायकाचे प्राण गेले. पृथ्वीभोवती साधारण नऊ फेऱ्या झाल्यावरच तिचा मृत्यू झाला होता. ती जिवंत परत येणार नाही शास्त्रज्ञांना आदीपासूनच माहिती होते. परंतु तिच्या प्रशिक्षकांच्या अंदाजापेक्षा ती थोडी लवकरच मरण पावली होती.  तिच्या मृत्यूची बातमी लपविण्यात आली होती. तसेच तिला पृथ्वीच्या कक्षेत येण्यापुर्वी खाण्यातून विष देऊन वेदनादायी मृत्यूपासून तिची सूटका केल्याचेही सांगण्यात येते. 14 एप्रिल 1858 रोजी तिचे अवशेष परत आलेल्या यानातून बाहेर काढण्यात आले. लायकानंतर तीन वर्षांनी वैज्ञानिकानी दोन नवे श्वान, काही उंदिर, ससेही अंतराळात पाठविले होते. हे सर्व प्राणी पृथ्वीवर जिवंत परत आले होते. त्यानंतर युरी गागारिन या अंतराळविराने पृथ्वीची कक्षा भेदून अंतराळात प्रवेश केला. युरी गागारिन हे पहिले अंतराळवीर होते.