शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे एकाच दिवसात ५.८० लाख रुग्ण; संसर्गाचा विळखा, लहान मुलांमध्येही प्रसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 05:49 IST

Coronavirus : ब्रिटन,युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी ओमायक्राॅनच्या प्रसारामुळे कोरोना साथीचा धोका आणखी वाढला आहे.

वॉशिंग्टन : अमेरिकेमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे ५ लाख ८० हजार नवे रुग्ण सापडले. तिथे एकाच दिवसात आढळलेली नव्या रुग्णांची ही सर्वाधिक संख्या आहे. तसेच कोरोनाची बाधा झालेल्या लहान मुलांना रुग्णालयात दाखल करण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. ही स्थिती अतिशय चिंताजनक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी म्हटले आहे. ब्रिटन,युरोपातील देश, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी ओमायक्राॅनच्या प्रसारामुळे कोरोना साथीचा धोका आणखी वाढला आहे.

ओमायक्रॉनने जगाला घातलेला विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. अमेरिकेत कोरोनाने माजविलेला हाहाकार कमी होण्याऐवजी वाढला आहे. २२ ते २८ डिसेंबर या आठवडाभरात दररोज सरासरी ३७८ मुलांना कोरोना बाधेमुळे रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.  गेल्या सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गामुळे दररोज ३४२ मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. ओमायक्रॉनमुळे अमेरिका, युरोपसह अनेक देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची भीती आहे. अमेरिकेतील १८ राज्यांमध्ये विक्रमी आकडा नोंदविण्यात आला आहे. 

फ्रान्समध्ये त्सुनामीफ्रान्समध्ये दररोज २ लाख नवे कोरोना रुग्ण सापडत आहेत. युरोपातील कोणत्याही देशापेक्षा फ्रान्समध्ये दररोज सर्वाधिक रुग्ण आढळत असून दर सेकंदाला दोन फ्रेंच नागरिक कोरोनाबाधित होतात. 

ब्रिटनची बिकट स्थितीब्रिटनमध्ये एकाच दिवसात कोरोनाचे १ लाख ८९ हजार १२३ रुग्ण सापडले आहेत. त्या देशातील बहुसंख्य लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. ओमायक्राॅनच्या वेगवान प्रसारामुळे ब्रिटनमधील स्थिती बिकट झाली आहे. 

स्पेनमध्ये दररोज १ लाख रुग्णस्पेनमध्ये दररोज १ लाखांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद होत आहे. ओमायक्रॉनमुळे तिथे संसर्ग इतक्या वेगाने पसरत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. स्पेनमधील लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस देण्यात आले होते. तेथील ज्येष्ठ नागरिकांपैकी ८० टक्क्यांहून अधिक जणांना याआधीच बूस्टर डोस देण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेत रात्रीची संचारबंदी रद्ददक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या लाटेने कळस गाठून ती आता उतरणीला लागली आहे. त्यामुळे आता त्या देशात रात्रीची संचारबंदी उठविण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेत कोरोना साथीची चौथी लाट आली आहे. ओमायक्रॉनचा विषाणू सर्वप्रथम दक्षिण आफ्रिकेतच आढळून आला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका