शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉन डेल्टापेक्षा ५० टक्के कमी घातक; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या घटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 07:17 IST

लस घेतलेली नाही, त्यांची प्रकृती गंभीर होऊन रुग्णालयात दाखल करावे लागण्याचा मोठा धोका संभवतो, असे म्हटले जात आहे.

लंडन :ओमायक्रॉन हा आधीच्या डेल्टा किंवा इतर कोरोना विषाणूंपेक्षा ५० टक्के कमी घातक आहे. त्यामुळे पूर्वी कोरोना संसर्गाने जितके रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते, त्यापेक्षा ओमायक्रॉनमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या निम्म्याने घटणार आहे. 

लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजने केलेल्या पाहणीच्या निष्कर्षात म्हटले आहे की, ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णालयात एक दिवस किंवा त्याहून थोडा काळ उपचार केले तरी ते पुरेसे होणार आहेत. मात्र, ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांची प्रकृती गंभीर होऊन रुग्णालयात दाखल करावे लागण्याचा मोठा धोका संभवतो. प्रा. निल फर्ग्युसन यांनी सांगितले की, सध्या वापरण्यात येणाऱ्या लसींचा प्रभाव ओमायक्रॉनविरोधात किती टिकून राहातो यावरही आमचा अभ्यास सुरू आहे. नव्या विषाणूची संसर्गशक्ती डेल्टापेक्षा अधिक असल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते, असा इशाराही त्यांनी दिला. एडिनबर्ग विद्यापीठाने केलेल्या स्वतंत्र पाहणीच्या निष्कर्षात म्हटले आहे की, डेल्टा विषाणूच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या संसर्गावेळी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत निम्म्याहून अधिक घट होईल; मात्र काही शास्त्रज्ञांना हे मत मान्य नाही.

चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिकमुळे लॉकडाऊन

- चीनमध्ये काही आठवड्यांनंतर हिवाळी ऑलिम्पिक होणार आहे. त्यावेळी कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार टाळण्यासाठी चीनच्या क्षिआन शहरात बुधवारी मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्यात आले.

- त्यामुळे तेथील सुमारे १.३ कोटी लोकांना काही दिवस या निर्बंधांमध्ये राहावे लागणार आहे.

- प्रत्येक घरातील एका माणसाला दर दोन दिवसांनी आवश्यक गोष्टींच्या खरेदीसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात येईल.

इंग्लंडमध्ये नवे निर्बंध नाहीत

इंग्लंडमध्ये ओमायक्रॉनचा झपाट्याने प्रसार झालेला असला तरी ख्रिसमसच्या कार्यक्रमांवर नवी बंधने न लादण्याचा निर्णय त्या देशाचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घेतला आहे. या कार्यक्रमांमध्ये मर्यादित संख्येने लोकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.

६०% लोकांचे पूर्ण लसीकरण

देशात कोरोना विषाणूवरील लस घेण्यास पात्र असलेल्या लोकसंख्येपैकी ६० टक्क्यांचे पूर्ण लसीकरण झाले आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी गुरुवारी ट्विटरवर म्हटले. या लसीकरणाबद्दल त्यांनी देशाचे अभिनंदन केले. जनतेचा सहभाग आणि आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी समरसून केलेल्या प्रयत्नांमुळे ६० टक्क्यांच्या वर पात्र लोकांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या