शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 08:59 IST

ट्रम्प यांच्या शांतता कराराला इस्रायलने सुरुंग लावला असून लेबनॉनवर भीषण हल्ले सुरु केले आहेत.

Israel Lebanon Conflict: मध्यपूर्वेत शांतता निर्माण करण्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रयत्न अवघ्या काही तासांतच बिघडताना दिसत आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये बुधवारी झालेल्या ऐतिहासिक युद्धविरामानंतर काही तासांतच इस्रायलने लेबनॉनवर भीषण हल्ले चढवले आहेत. या हल्ल्यांमुळे संतापलेल्या इराणने पुन्हा एकदा जागतिक तेल पुरवठ्यासाठी महत्त्वाची असलेली  होर्मुज सामुद्रधुनी बंद केली असून, जगावर आता युद्धासोबतच मोठ्या आर्थिक संकटाचे सावट पसरले आहे.

१० मिनिटांत १०० हल्ले; लेबनॉनमध्ये मृतदेहांचा खच

युद्धविरामाच्या अटी धाब्यावर बसवत इस्रायलने बुधवारी लेबनॉनवर नरसंहार घडवून आणला. इस्रायली हवाई दलाच्या ५० लढाऊ विमानांनी अवघ्या १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणांवर १६० बॉम्ब फेकले. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १८२ लोकांचा मृत्यू झाला असून ८०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. हिजबुल्लाह-इस्रायल युद्धात एका दिवसात झालेला हा आजवरचा सर्वात मोठा हल्ला आहे.

लेबनॉन करारात नाहीच; इस्रायल आणि अमेरिकेची भूमिका

व्हाईट हाऊस आणि पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट केले  की, इराणसोबत झालेला युद्धविराम लेबनॉनला लागू होत नाही. ट्रम्प यांनीही "लेबनॉन या कराराचा भाग नाही, हिजबुल्लाहचा मुद्दा आम्ही नंतर मार्गी लावू," असे म्हटल्याने इराणने संताप व्यक्त केला आहे.

लेबनॉनची मदतीसाठी हाक

लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ सलाम यांनी जगातील मित्र राष्ट्रांना मदतीसाठी आवाहन केले आहे. "इस्रायल आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली करत असून निष्पाप नागरिकांची हत्या करत आहे," असे त्यांनी म्हटले आहे. बेरूतसह दक्षिण लेबनॉनमधील रुग्णालये आता मृतदेह आणि जखमींनी भरली असून रेड क्रॉसच्या १०० हून अधिक रुग्णवाहिका युद्धपातळीवर काम करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Israel's Massive Attack on Lebanon: 10 Minutes, 100 Locations, 160 Bombs

Web Summary : Israel's strikes on Lebanon, following a US-Iran truce, killed 182. 100 locations were bombed in 10 minutes. Lebanon seeks international aid, citing international law violations. The conflict risks global economic instability.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIsraelइस्रायल