शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 06:11 IST

रशियातील टिंडा शहरापासून नजीकच्या ठिकाणी गुरुवारी एक प्रवासी विमान कोसळून त्यातील प्रवासी, कर्मचाऱ्यांसह सर्व ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

मॉस्को :रशियातील टिंडा शहरापासून नजीकच्या ठिकाणी गुरुवारी एक प्रवासी विमान कोसळून त्यातील प्रवासी, कर्मचाऱ्यांसह सर्व ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या देशाच्या आपत्कालीन स्थितीविषयक मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्विन-टर्बोप्रॉप प्रकारातील हे विमान नेमके कशामुळे कोसळले याचे निश्चित कारण अद्याप कळू शकलेले नाही.सैबेरियातील अंगारा एअरलाइन्सचे असलेले हे विमान खाबारोव्हस्क येथून रशिया-चीन सीमेजवळील टिंडा शहराकडे चालले होते. या परिसरात हवामान अतिशय प्रतिकूल असल्याने या विमानाच्या उड्डाणात अडथळे निर्माण झाले असावेत असे म्हटले जात आहे. मात्र, त्याला रशियाच्या सरकारने दुजोरा दिला नाही. रशियन प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे की, ५० वर्षे जुने असलेल्या या विमानाचे अवशेष दाट जंगलामध्ये आढळून आले. जिथे हे विमान कोसळले तिथून धुराचे लोट येत असल्याचे यासंदर्भातील छायाचित्रे व व्हिडीओ फितींमध्ये दिसून येते. 

बचावकार्यातही अडथळे विमान कोसळलेला भाग दुर्गम असून घनदाट जंगलामुळे वेढलेला आहे. त्यामुळे बचाव कार्यातही अडथळे आल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या विमानाने टिंडा येथे विमानतळाच्या धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत असतानाच त्याचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. हे विमान रडारवरून दिसेनासे झाले. त्यानंतर ते कोसळल्याचे व त्याचे अवशेष जंगलात आढळून आले.

तांत्रिक बिघाडामुळे एअर इंडियाचे विमान रद्दनवी दिल्ली : येथील विमानतळावरून मुंबईच्या दिशने निघालेल्या एअर इंडियाच्या एका विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने उड्डाण रद्द करण्यात आले. बुधवारी सांयकाळी विमान उड्डाणाच्या तयारीत असताना कॉकपिटमधील स्पीड डिस्प्ले स्क्रीन अचानक बंद पडली. त्यामुळे ए ३२० या फ्लाईटचे उड्डाण रद्द करण्यात आले. 

टॅग्स :Plane Crashविमान दुर्घटनाrussiaरशियाAccidentअपघात