शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

पाक सीमेवर ४०० मीटर बोगदा

By admin | Updated: May 5, 2014 15:00 IST

आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या साम्बा जिल्ह्यातील चिलियारी येथे पाकिस्तानातून भारतात येणारा आणखी एक बोगदा सापडला आहे.

 सीमा सुरक्षा दलाची कारवाई : २0१२ मध्येही उघड झाली होती अशीच घटनाजम्मू : आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या साम्बा जिल्ह्यातील चिलियारी येथे पाकिस्तानातून भारतात येणारा आणखी एक बोगदा सापडला आहे. तो भारतीय सीमेच्या २३ मीटर आत आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) यासंदर्भात पाकिस्तानकडे निषेध नोंदवला. बीएसएफ अधिकार्‍यांनी शनिवारी सांगितले की, घनदाट व लांब झाडेझुडपे साफ करीत असताना हा ३ बाय ३ फुटांचा बोगदा आढळून आला. यापूर्वी २८ जुलै २0१२ रोजी आढळून आलेल्या ४00 मीटर लांबीच्या बोगद्याला तो जोडलेला आहे. यासंदर्भात पाकिस्तानी रेंर्जसकडे निषेध नोंदवण्यात आलेला आहे.आंतरराष्ट्रीय सीमेनजीक खणण्यात आलेल्या या बोगद्यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला आहे. भारतात घुसखोरी व तस्करी करण्याच्या इराद्याने पाकिस्तानातून भारतीय सीमेत तो खोदण्यात आला आहे. पाकिस्तानने मात्र आधीप्रमाणे याही वेळी याचा इन्कार केला आहे. (वृत्तसंस्था)पाकची मुजोरीच्पाकमधून भारतात खोदण्यात आलेल्या या बोगद्याचा छडा लावण्याचे प्रयत्न पाकिस्तानने वेळोवेळी हाणून पाडले आहेत. च्एका बीएसएफ अधिकार्‍याने सांगितले की, जेव्हा केव्हा आम्ही बोगद्याच्या वरून पाकिस्तानच्या दिशेने खोदकाम सुरू करतो, तेव्हा सीमेपलीकडून खोदकाम करणार्‍यांवर गोळीबार केला जातो व आम्हाला रोखले जाते. च्बीएसएफ महासंचालक या मुद्यावर पुढे काय कारवाई करायची ते ठरवतील, असेही हा अधिकारी म्हणाला.