नैरोबी : सोमालियातील अल शबाब संघटनेच्या दहशतवाद्यांनी ईशान्य केनियात खाणीतील कामगारांवर हल्ला करुन ३६ जणांना गोळ्या घालून ठार मारले. गेल्या आठवड्यात एका बसचे अपहरण करुन त्यांनी २८ जणांनी हत्या केली होती, त्याचपद्धतीने दहशतवाद्यांनी किमान २ कामगारांचा शिरच्छेद मंगळवारी केला.मंदेरा गावात दहशतवाद्यानी पहाटे ३:३० वाजता हल्ला केला. झोपेत असलेल्या खाण कामगारांवर त्यांनी गोळ्या झाडल्या. मंदेरा हे गाव केनिया, सोमालिया व इथियोपिया यांच्या सीमेवर आहे. (वृत्तसंस्था)
३६ कामगारांची केनियात हत्या
By admin | Updated: December 3, 2014 01:27 IST