शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

गाझामधील हल्ल्यांत ३६ पॅलेस्टिनींचा बळी; मृतांमध्ये एका कुटुंबातील ११ जण, दोन मुलांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 10:36 IST

गाझातील खान युनिस शहरात सकाळी इस्रायलच्या हवाई हल्ल्यांत त्यांच्या घरावर बॉम्ब पडला.

कैरो : इस्रायली लष्कराने दक्षिण गाझा पट्टीत केलेल्या अनेक हल्ल्यांत ३६ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत.

जखमींवर उपचार सुरू असलेल्या कैरोमधील नासेर हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितले की, मृतांमध्ये एका कुटुंबातील ११ जणांचा समावेश आहे. त्यात २ मुलेही आहेत. गाझातील खान युनिस शहरात सकाळी इस्रायलच्या हवाई हल्ल्यांत त्यांच्या घरावर बॉम्ब पडला. आणखी दोन हल्ले खान युनिसमधील रस्त्यावरील प्रवासी वाहनावर झाले. एका हल्ल्यात १७, तर दुसऱ्या हल्ल्यात ५ प्रवासी ठार झाले. नासेर हॉस्पिटलमध्ये ३३ मृतदेह आणले गेले आहेत. खान युनिसमधील ३ स्वतंत्र हल्ल्यात हे लोक ठार झाले. शहरातील अल-अक्सा मार्टर्स हॉस्पिटलमध्येही ३ मृतदेह आणण्यात आले आहेत.  गेल्या वर्षी ७ ऑक्टोबर रोजी हमास आणि अन्य संघटनांच्या अतिरेक्यांनी इस्रायलवर अचानक हल्ला केल्यानंतर गाझामधील युद्धाला तोंड फुटले होते. 

शस्त्रसंधीसाठी बोलणी

दरम्यान, इस्रायल व हमास यांच्यात शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी अमेरिका, इजिप्त आणि कतार यांनी पुढाकार घेतला असून, रविवारी कैरो येथे उच्चस्तरीय बैठक होत आहे. त्याआधी शनिवारी तज्ज्ञांची एक बैठक पार पडली.

हमासचे एक पथक शनिवारी कैरोत दाखल झाले. हमास चर्चेत थेट सहभागी होणार नाही. इजिप्त व कतारकडून हमासला वाटाघाटींची माहिती देण्यात येईल.

टॅग्स :Gaza Attackगाझा अटॅक