शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी ३५० पाणघोड्यांचा बळी?

By admin | Updated: September 15, 2016 03:10 IST

सध्या सुरू असलेल्या दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी यासाठी दक्षिण आफ्रिकेतील क्रुगेर नॅशनल पार्क या सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी तेथील सुमारे ३५० पाणघोडे व रानरेड्यांना ठार मारणार आहेत.

दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत घेणार ३५० पाणघोड्यांचा बळी; चारा वाचवण्यास रानरेड्यांनाही मारणार!जोनान्सबर्ग : सध्या सुरू असलेल्या दुष्काळाची तीव्रता कमी व्हावी यासाठी दक्षिण आफ्रिकेतील क्रुगेर नॅशनल पार्क या सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानातील अधिकारी तेथील सुमारे ३५० पाणघोडे व रानरेड्यांना ठार मारणार आहेत.या जंगली जनावरांना मारल्यानंतर त्यांचे मांस राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात राहणाऱ्या गोरगरिबांना वाटले जाईल, असे नॅशनल पार्क सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.या कारवाईमागचा विचार स्पष्ट करताना पार्क सर्व्हिसचे प्रवक्ते इक फाहला म्हणाले की, पाणघोडे आणि रानरेडे हे प्राणी खूप मोठ्या प्रमाणावर गवत व झाडपाला खातात. दुष्काळामुळे तृणभक्षक प्राण्यांच्या अन्नाची उपलब्धता कमी झाल्याने एरवीही यापैकी बरेच प्राणी उपासमारीने मेलेच असते. त्यांची संख्या पद्धतशीरपणे कमी केल्याने निदान उरलेल्या प्राण्यांना तरी उपलब्ध खाद्य जास्त दिवस पुरू शकेल. (वृत्तसंस्था)दक्षिण आफ्रिकेतील सध्याचा दुष्काळ हा गेल्या ३५ वर्षांतील सर्वात भीषण असल्याचे मानले जाते. १९९०च्या दशकाच्या सुरुवातीस असाच तीव्र दुष्काळ पडला होता तेव्हा क्रुगेर राष्ट्रीय उद्यानातील रानरेड्यांची संख्या सुमारे निम्मी म्हणजे १४ हजार झाली होती. मात्र नंतर ही संख्या पुन्हा वाढली होती.क्रुगेर नॅशन पार्कमध्ये सध्या ७,५०० पाणघोडे व ४७हजार रानरेडे असून त्यांची ही संख्या आजवरची सर्वाधिक आहे.