इस्लामाबाद : एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून (एडीबी) पाकिस्तान ३.४ अब्ज अमेरिकन डॉलरचे कर्ज घेणार आहे, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सल्लागाराने म्हटले. पाक सध्या प्रचंड रोखटंचाईला तोंड देत आहे. वाढती देणी भागविण्याच्या चिंतेत आहे. देणी वाढतच गेल्यास अर्थव्यवस्था कोसळण्याचे संकट उभे ठाकले आहे. बँकेशी करार झाल्यापासून वर्षभरात २.१अब्ज दिले जातील, असे फेडरलमंत्री (नियोजन, विकास आणि सुधारणा) खुशरो बख्तियार यांनी म्हटल्याचे ‘डॉन’ दैनिकाने म्हटले.हे कर्ज ‘सवलतीच्या व्याज दरात’ असल्याचे बख्तियार यांनी सांगितले. पंतप्रधानांचे अर्थ सल्लागार डॉ. अब्दुल हाफीज शेख टिष्ट्वटरवर म्हणाले की, अर्थसंकल्पाला पाठिंबा म्हणून एडीबी पाकिस्तानला ३.४ अब्ज डॉलर्सचे कर्ज देणार आहे. आर्थिक वर्ष २०२९-२०२० च्या पहिल्या तिमाहीत २.२ अब्ज डॉलर्स दिले जाईल. या पहिल्या हप्त्यामुळे गंगाजळीची परिस्थिती आणि बाह्य खात्यात सुधारणा होईल.
एडीबी पाकला देणार ३.४ अब्ज डॉलर्सचे कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 02:49 IST