शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:22 IST

300 Year Old Shipwreck India to Portugal: ३०० वर्षांपूर्वीचे खजिन्याचे जहाज सापडले, भारतातून पोर्तुगालला जात असताना झालेली लूट!

समुद्राच्या अथांग गर्भात शेकडो वर्षांपासून दडलेली रहस्ये आता उलगडू लागली आहेत. पुरातत्वशास्त्रज्ञांनी अशा एका जहाजाचा ढिगारा शोधून काढला आहे, जे ३०० वर्षांपूर्वी भारतातून अब्जावधींचा खजिना घेऊन पोर्तुगालकडे निघाले होते. 'नोसा सेन्होरा दो काबो' असे या जहाजाचे नाव असून, समुद्री चाच्यांच्या हल्ल्यात ते मादागास्करजवळ बुडाले होते.

हे जहाज १७२१ मध्ये तेव्हाची पोर्तुगीज वसाहत असलेल्या गोव्याहून लिस्बनसाठी निघाले होते. या जहाजावर सोन्या-चांदीच्या विटा, हिरे-मोती, मौल्यवान रत्ने, रेशमी कापड आणि धार्मिक कलाकृतींचा मोठा साठा होता. आजच्या बाजारभावानुसार या खजिन्याची किंमत तब्बल १३८ दशलक्ष डॉलर्स सुमारे १,१५० कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

समुद्री चाच्यांचा थरार८ एप्रिल १७२१ रोजी हिंद महासागरातील 'रियुनियन बेटा'जवळ हे ७०० टनी जहाज नांगरून उभे असताना 'ओलिव्हियर लेव्हासूर' आणि 'जॉन टेलर' या कुख्यात समुद्री चाच्यांनी त्यावर हल्ला केला. चाच्यांनी या जहाजाला आपल्या अड्ड्यावर नेले आणि तिथे प्रचंड लूट केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी शेवटी हे जहाज समुद्रात बुडवून दिले.

मलब्यात काय सापडले?पुरातत्वशास्त्रज्ञांना या जहाजाच्या अवशेषातून आतापर्यंत ३,३०० हून अधिक वस्तू सापडल्या आहेत. यात सोन्याची नाणी, चिनी मातीची भांडी आणि काही दुर्मिळ मूर्तींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अजूनही या मलब्यात मोठा खजिना दडलेला असण्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे, कारण जहाजाचा बराचसा भाग अजूनही वाळूखाली गाडला गेला आहे.

सेंटर फॉर हिस्टोरिक शिपव्रेक प्रिजर्वेशनच्या संशोधकांनी मादागास्करजवळील नोसी बोराहा बेटाजवळ हा शोध लावला असून, या ऐतिहासिक खुणांमधून १८ व्या शतकातील समुद्री व्यापाराची आणि लुटालुटीची नवीन माहिती समोर येत आहे.

टॅग्स :Portugalपोर्तुगालgoaगोवा