शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
2
अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
3
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
4
पती पत्नीसाठी बेस्ट आहे Post Office ची 'ही' स्कीम; ५ वर्षांत जमवू शकता १३ लाख रुपये, जाणून घ्या
5
नवऱ्याला सोडून पुतण्यासोबत लग्न, आता पुन्हा गावात येऊन पहिल्या पतीला दिलं थेट आव्हान! म्हणाली...
6
भारताविरोधात एवढी कारस्थाने रचून ट्रम्पना अजूनही आशा; सही केली पण टेरिफ ७ दिवस टाळले
7
खुर्चीवरुन कोसळला अन्...; ३० वर्षीय डिलिव्हरी बॉयचा हार्ट अटॅकने मृत्यू, २ मुली झाल्या पोरक्या
8
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
9
मृत मुलाला जिवंत करण्यासाठी आईची धडपड; कधी CPR तर कधी ऑक्सिजन दिला, हृदयद्रावक Video व्हायरल
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा २५% टॅरिफचा निर्णय लांबणीवर, काय असणार आता नवी तारीख?
11
५ महिन्याच्या गर्भवतीचे हात-पाय तोडले; दारूच्या नशेत पतीने बेदम मारले, पत्नीची निर्दयी हत्या
12
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
13
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
14
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
15
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
16
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
17
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
18
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
19
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
20
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट

नायजेरियात बोको हरामच्या हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू, 82 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2017 06:52 IST

नायजेरिया पुन्हा एकदा बोको हरामच्या दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे.

कानो, दि. 16 - नायजेरिया पुन्हा एकदा बोको हरामच्या दहशतवादी हल्ल्यानं हादरलं आहे. या बॉम्बहल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर 82 जण जखमी आहेत. उत्तर-पूर्व नायजेरियातील एका शिबिराच्या प्रवेशद्वारावर तीन अज्ञात हल्लेखोर महिला आल्या आणि त्यांनी आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवला. बोको हरामच्या दहशतवाद्यांनी मंदारी शहरातील मैदुगिरीपासून 25 किलोमीटरवर अंतरावर असलेल्या एका ठिकाणाला यावेळी लक्ष्य केलं, अशी माहिती दहशतवादविरोधी पथकाचे अधिकारी बाबा कुरा यांनी दिली आहे.पहिल्या दहशतवादी महिलेनं स्वतःला उडवून घेतल्यानंतर तिच्या पाठोपाठ इतर दोन महिलांनीही आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणला. या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 82 जखमी लोकांना तातडीनं मैदुगिरीच्या रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. पूर्वोत्तर नायजेरियात बोको हराम या दहशतवादी संघटनेनं प्रचंड उत्पाद घडवला आहे. अपहरण, गोळीबार आणि आत्मघातकी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या प्रकारांमुळे बोको हराम या दहशतवादी संघटनेचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. गेल्या काही दिवसांपूर्वी बोको हराम या क्रूर दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी मैदुगिरी येथील डालोरी गावावरही दहशतवादी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात लहान मुलांसह 86 जण ठार झाले होते. अतिरेक्यांनी डालोरी गाव आणि जवळ असलेल्या 25 हजार शरणार्थींच्या दोन तळावर हल्ला केला. बोको हरामच्या तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार आणि बॉम्बस्फोट केले होते. त्यावेळी गावातील घरांना आगी लावून लहान मुलांना जिवंत जाळले होते. जवळपास चार तास मुक्तपणे या दहशतवाद्यांचा हिंसाचार सुरू होता. तेव्हासुद्धा तीन आत्मघातकी महिला हल्लेखोरांनी स्वत:ला स्फोटामध्ये उडवून घेतले होते. काही जणांनी झाडाझुडपाचा आश्रय घेऊन स्वत:चा जीव वाचवला होता. मैदुगिरीमध्ये लष्करी तळ असूनही लगेच मदत मिळाली नाही अशी तक्रार या हल्ल्यातून बचावलेल्या नागरिकांनी त्यावेळी केली होती. बोको हरामने नायजेरियात आतापर्यत केलेल्या विविध दहशतवादी हल्ल्यात 20 हजार नागरिक ठार झाले आहेत.