शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

इस्रायलच्या भीषण हल्ल्यात २७४ पॅलेस्टिनी ठार; शेकडाे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 05:48 IST

Israel-Hamas war: हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान २७४ पॅलेस्टिनी ठार तर शेकडो जखमी झाले, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. या मोहिमेत चार इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात आली.

दीर अल-बलाह - हमासच्या ताब्यातील ओलिसांची सुटका करण्यासाठी इस्रायलने केलेल्या हल्ल्यात किमान २७४ पॅलेस्टिनी ठार तर शेकडो जखमी झाले, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले. या मोहिमेत चार इस्रायली ओलिसांची सुटका करण्यात आली. गाझाच्या दाट लोकवस्तीच्या भागात दिवसा ही कारवाई करण्यात आली.  हमासने इस्रायली ओलिसांना दाट लोकवस्तीच्या भागात किंवा बोगद्यांत ठेवल्याचे मानले जाते. फेब्रुवारीत अशाच एका मोहिमेत दोन ओलिसांची सुटका करण्यात आली होती. तेव्हा ७४ पॅलेस्टिनी मारले गेले होते. हमासने ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. यात १२०० इस्रायली ठार झाले होते, तर २५० जणांना ओलीस ठेवण्यात आले होते. 

तेव्हापासून इस्रायलचे पॅलेस्टाईनवर हल्ले सुरू असून, यात आतापर्यंत ३६ हजार ७०० हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. शनिवारच्या हल्ल्यात ७०० लोक जखमी झाले असून मृतांत अनेक महिला आणि मुलांचा समावेश आहे. 

अमेरिकेतील ५० विद्यापीठांत निदर्शनेएप्रिलमध्ये अमेरिकेतील ५० विद्यापीठांत विद्यार्थ्यांनी महिनाभर आंदोलन केले होते. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाची हॅमिल्टन बिल्डिंगही ताब्यात घेतली होती. मात्र, पोलिसांनी अवघ्या दोन तासांत इमारत मुक्त केली. यानंतर, आठवडाभरापूर्वी पॅलेस्टाईन समर्थकांनी न्यूयॉर्कमधील एका संग्रहालयाचा ताबा मिळवला होता. 

व्हाईट हाऊससमोर पॅलेस्टिनींची निदर्शनेवाॅशिंग्टन : गाझातील इस्रायली हल्ल्यांदरम्यान ३० हजार पॅलेस्टाईन समर्थकांनी अमेरिकी अध्यक्षांचे निवासस्थान व्हाईट हाऊससमोर  निदर्शने केली. हमासचे बँड बांधलेले निदर्शक पॅलेस्टाईनचा झेंडा फडकावताना दिसले. निदर्शकांनी अमेरिकेचा ध्वज पेटवून ‘फ्री पॅलेस्टाईन’च्या घोषणा दिल्या. 

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षUnited Statesअमेरिका