शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जगातील 27 कोटी लोक भूकबळीच्या वाटेवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 13:23 IST

संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न मदत संस्थेचे प्रमुख व वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिसले यांनी जगाला इशारा देताना म्हटलं आहे, ‘विकसनशील जगातील तीसपेक्षा अधिक देशांत अन्नधान्याचा तीव्र दुष्काळ यामुळे पडण्याची शक्यता आहे. त्यातल्या दहा देशांत आधीच एक कोटीहून अधिक लोक उपाशी आहेत. या तीस देशांतील जवळपास 27 कोटी लोक आजच मरणाच्या दारात उभे आहेत.

ठळक मुद्देतीस विकसनशील देशांना  संयुक्त राष्ट्रसंघाचा इशारा!

लोकमत न्यूज नेटवर्ककोविड-19! चीनमध्ये पहिल्यांदा या साथीच्या आजाराचा उगम झाल्यानंतर इतक्या झपाट्यानं संपूर्ण जगात त्याचा प्रसार हाईल आणि अख्खं जग त्याच्या कचाट्यात सापडेल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. अमेरिकेसह बहुसंख्य देशांना वाटलं होतं, चीनमध्ये उगम झालेल्या या रोगाचा फटका केवळ चीनलाच बसेल, आपल्यापर्यंत तो येणार नाही. पण तसं झालं नाही. जगातल्या जवळपास प्रत्येक देशाला कोरोनाचा फटका बसला आहे. अनेक पातळ्यांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे, पण सर्वात मोठा परिणाम झाला आहे, तो लोकांच्या भुकेवर आणि अर्थातच त्यांच्या जगण्या-मरण्यावर!संयुक्त राष्ट्रसंघानंही त्याबाबत चिंता व्यक्त करताना जगाचं काय होईल याबाबत प्रo्नचिन्ह उभं केलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचं म्हणणं आहे. कोरोनाचा प्रभाव इतका प्रचंड असेल, असं कोणालाही वाटलं नव्हतं. कोरोनामुळे अख्ख्या जगालाच व्यापक दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. जगातल्या कोट्यवधी लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे.संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न मदत संस्थेचे प्रमुख व वर्ल्ड फूड प्रोग्रामचे कार्यकारी संचालक डेव्हीड बिसले यांनी तर जगाला इशारा देताना म्हटलं आहे, ‘विकसनशील जगातील तीसपेक्षा अधिक देशांत अन्नधान्याचा तीव्र दुष्काळ यामुळे पडण्याची शक्यता आहे. त्यातल्या दहा देशांत आधीच एक कोटीहून अधिक लोक उपाशी आहेत. ज्या लोकांना उपाशीपोटी झोपावं लागतंय त्यांच्याविषयी आम्ही बोलत नाही आहोत. आम्ही आत्ताच्या आपत्कालिन परिस्थितीविषयी बोलतो आहोत. लोकं अक्षरश: उपासमारीच्या दिशेनं निघाले आहेत आणि दर दिवसागणिक मृत्यूच्या दाढेत ते ढकलले जात आहेत. या लोकांना जर आपण वेळेत अन्नधान्याचा पुरवठा करू शकलो, नाही, त्यांना खायला मिळालं नाही, तर त्यांचं मरण अटळ आहे!’या तीस देशांतील जवळपास 27 कोटी लोक आजच मरणाच्या दारात उभे आहेत, असंही संयुक्त राष्ट्रसंघाचं निरीक्षण आहे. डेव्हीड बिसले यांचं म्हणणं आहे की, कोरोना अजूनही आपले हातपाय पसरतोच आहे. कृती करायला आपल्याला फार थोडा वेळ आहे. आपण जर याबाबत फक्त विचारच करत राहिलो आणि प्रत्यक्ष कृतीला थोडाही उशीर केला, तर या गरीब, भुकेकंगाल लोकांची कलेवरं पाहण्याशिवाय आपल्या हातात काहीच राहणार नाही. या अत्यंत बिकट अशा परिस्थितीत या विकसनशील देशांपुढील आव्हान अतिशय बिकट आहे. त्यांना स्वत:ला तर यावरचा पर्याय शोधून काढावाच लागेल, युद्धपातळीवर त्यासाठी प्रय} करावेच लागतील, पण जगातल्या इतर देशांनीही या लोकांना मदत केली पाहिजे. या काळात कुठलाही भेदभाव, अपपरभाव प्रत्येकाच्याच विनाशाला कारणीभूत ठरू शकतो. कोरोनाचा मुकाबल आणि त्याविरुद्धचा आमचा बचाव आम्ही स्वत:, एकट्यानंच करू शकतो, असा कुठल्याही देशाचा समज असेल, तर तो चुकीचा आहे, असंही संयुक्त राष्ट्रसंघानं स्पष्ट केलं आहे. आज सुरुवातीला हे तीस देश सुपात आहेत, पण कालांतरानं इतर देशही त्याच वाटेवर येऊ शकतात, त्यामुळे एक व्हा, एकत्र या, एकमेकांना मदत करा, भुकेल्यांच्या पोटात किमान दोन घास जाऊ द्या. हीच आजची तातडीची गरज आहे.