शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर रेहमानला जामीन

By admin | Updated: December 19, 2014 05:38 IST

पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे.

ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. १८ - दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलू अशी वल्गना पाकच्या पंतप्रधानांनाी केली असतानाच पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकीर उर रेहमान लखवीला जामीन मंजूर केला आहे. एकीकडेे मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद पाकमध्ये मोकाट फिरत असतानाच लखवीलाही जामीन मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

२६/११ च्या मुंबई हल्ल्याप्रकरणी झकीर उर रेहमान लखवी आणि अन्य सात जणांविरोधात पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी न्यायालयात खटला सुरु आहे. याप्रकरणी पाकमधील सुरक्षा यंत्रणांनी लखवी, अब्दूल वाजीद, मझहर इक्बाल, शाहीद जमील रियाझ, जमील अहमद आणि युसूफ अंजूम यांना २००९ मध्ये अटक केली होती. या सर्वांविरोधात मुंबई हल्ल्यांचा कट रचणे,  आर्थिक सहाय्य करणे अशा विविध कलमांखाली खटला सुरु आहे. याप्रकरणातील झकीर उर रेहमान लखवीला गुरुवारी पाकिस्तानमधील न्यायालयाने पाच लाख रुपयांच्या बॉंडवर जामीन मंजूर केला. 

मुंबई हल्ल्याप्रकरणी पाकमधील सुनावणीप्रक्रिया संथगतीने सुरु असल्याचे भारताने वारंवार निदर्शनास आणून दिले आहे. पाकिस्तान दहशतवादाविरोधात गंभीर असेल तर त्यांनी आधी हा खटला झटपट निकाली काढावा अशी मागणीही  भारताने केली होती. पेशावरमधील शाळेवर दहशतवादी हल्ला झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्याची घोषणा केली होती. यानुसार फाशीच्या शिक्षेवरील बंदी तातडीने उठविली आणि दहशतवादाविरुद्ध सात दिवसांत ठोस कृती आराखडा तयार करण्याचा निश्चयही शरीफ यांनी जाहीर केला होता. मात्र या गर्जनेला २४ तासांचा कालावधी लोटला असतानाच पाकमधील कोर्टाने रेहमानला जामीन दिला आहे. या निर्णयावर भारताने नाराजी दर्शवली आहे.