शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus: कोरोना परततोय! युराेप, मध्य आशियात ८ दिवसांत २४ हजार मृत्यू; आणखी एका लाटेची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 06:04 IST

Corona Virus in Europe, Asia: वर्षभरापूर्वी आम्ही जिथे हाेताे, आज पुन्हा त्याच वळणावर आलाे आहाेत. मात्र, विषाणूबाबत तुलनेने अधिक माहिती आहे. तसेच चांगले उपकरण उपलब्ध आहेत.

जिनेव्हा : युराेप आणि मध्य आशिया खंडातील ५३ देशांमध्ये काेराेनाच्या आणखी एका लाटेची भीती जागतिक आराेग्य संघटनेने व्यक्त केली आहे. या भागात गेल्या आठवडाभरात १८ लाख नवे रुग्ण आढळले असून, २४ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. हे आकडे वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

जागतिक आराेग्य संघटनेच्या विभागीय कार्यालयाच्या प्रमुख डाॅ. हॅन्स क्लूज यांनी नव्या रुग्णांची संख्या पुन्हा रेकाॅर्ड पातळीवर पाेहाेचत असल्यावरून गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले, की या ५३ देशांमध्ये आणखी एक लाट येण्याची शक्यता आहे किंवा नव्या लाटेचा सामना करीत आहेत. संसर्ग पुन्हा वेगाने वाढू लागला आहे. युराेप पुन्हा एकदा महामारीच्या केंद्रस्थानी आला आहे.

वर्षभरापूर्वी आम्ही जिथे हाेताे, आज पुन्हा त्याच वळणावर आलाे आहाेत. मात्र, विषाणूबाबत तुलनेने अधिक माहिती आहे. तसेच चांगले उपकरण उपलब्ध आहेत. डाॅ. क्लूज यांनी सांगितले, की संसर्ग राेखण्यासाठीचे उपाय आणि काही क्षेत्रात लसीकरणाचा कमी दर चिंतेचा विषय आहे. रुग्णसंख्या का वाढत आहे, याचे उत्तर त्यातून मिळते. आठवडाभरात मृतांचा आकडा १२ टक्क्यांनी वाढून २४ हजारांवर गेला आहे. तसेच १८ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. यातही सहा टक्के वाढ झाली आहे. 

...तर फेब्रुवारीपर्यंत पाच लाख मृत्यू गेल्या आठवड्यात ५३ देशांमध्ये काेराेनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे.  हीच परिस्थिती कायम राहिल्यास फेब्रुवारीपर्यंत आणखी पाच लाख लाेकांचा महामारीमुळे मृत्यू हाेऊ शकताे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

रशियामध्ये ११९५ रुग्णांचा मृत्यूरशियामध्ये काेराेनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. गेल्या २४ तासांमध्ये रशियात ११९५ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४० हजार नवे रुग्ण आढळले आहेत.  दरराेज एक हजारांहून अधिक जणांचा मृत्यू आणि ४० हजारांहून अधिक रुग्णांची नाेंद हाेत असल्याने चिंता वाढली आहे. 

ब्रिटनमध्ये ४० हजार नवे रुग्णब्रिटनमध्येही दरराेज सरासरी ३५ ते ४० हजार नवे रुग्ण आढळत आहेत. मात्र, हा आकडा गेल्या दाेन आठवड्यांपासून कमी हाेत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या