शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

85 वर्षीय वृद्धाच्या प्रेमात वेडी झाली 24 वर्षांची तरुणी; म्हणते, "मला व्हायचंय त्याच्या बाळाची आई"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 17:00 IST

24 वर्षीय मिरेकलने आपल्यापेक्षा 61 वर्षांनी मोठ्या असलेल्या 85 वर्षीय चार्ल्स पोग यांची जीवनसाथी म्हणून निवड केली.

'प्रेम आंधळं असतं' असं म्हणतात. प्रेमाचे भन्नाट किस्से हे आपण नेहमीच ऐकत असतो. अशीच एक अजब प्रेमाची गजब कहाणी पाहायला मिळत आहे. एक 24 वर्षांची तरुणी चक्क 85 वर्षाच्या वृद्धाच्या प्रेमात पडली. दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात बुडाले आहेत. एवढच नाही तर तरुणीला वृद्धाच्या बाळाची आता आई व्हायचं आहे. लोक काय म्हणतील याचा विचार न करता हे दोघे एकत्र राहतात. 

अमेरिकेतील मिसिसिपी येथे राहणाऱ्या 24 वर्षीय मिरेकलने आपल्यापेक्षा 61 वर्षांनी मोठ्या असलेल्या 85 वर्षीय चार्ल्स पोग यांची जीवनसाथी म्हणून निवड केली. आता दोघेही फॅमिली प्लॅनिंग करत आहेत. मिरेकलचे म्हणणे आहे की, तिला IVF च्या माध्यमातून आता मुलाला जन्म द्यायचा आहे. निवृत्त रिअल इस्टेट एजंट चार्ल्ससोबत 2019 मध्ये मिरेकलची भेट झाली होती. मग मिरेकलला ​​चार्ल्ससोबतच्या तिच्या नात्याबद्दल लोकांकडून खूप टोमणे ऐकावे लागले. 

चार्ल्स घरात एकटेच राहत होते. त्यामुळे त्यांची काळजी घेणारे कोणी नव्हते. चार्ल्सने मिरेकलला परिचारिका म्हणून नियुक्त केले. या काळात त्यांना मनातून मिरेकल कधी आवडू लागली, हे कळलेच नाही. जवळजवळ एक वर्षानंतर, फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी आपल्या भावना मिरेकलशी शेअर केल्या.

मिरेकलच्या मते, तिची 45 वर्षीय आई तामिका फिलिप्स आणि 72 वर्षीय आजोबा जो ब्राउन यांना चार्ल्ससोबतच्या तिच्या नात्यात कोणतीही अडचण नव्हती, कारण चार्ल्सने त्यांची खूप काळजी घेतली होती. मात्र 47 वर्षीय वडील करीम फिलिप्स यांचा यावर तीव्र आक्षेप होता. आजही तिच्या वडिलांनी हे नाते मनापासून स्वीकारलेले नाही. मिरेकल आणि चार्ल्सचे गेल्या वर्षी जुलैमध्ये लग्न झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"