शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

वाहने थांबवली, चौकशी केली अन् २३ जणांना घातल्या गोळ्या; मोठा दहशतवादी हल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 12:56 IST

Terrorist Attack in Pakistan : बलुचिस्तान प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अनेक बस, ट्रक आणि व्हॅन रोखल्या. त्यानंतर दहशतवाद्यांनी जात ओळखून लोकांना गोळ्या घातल्याचे सांगण्यात येत आहे.

Terrorist Attack in Pakistan : पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये दहशतवाद्यांनी २३ जणांची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बलुचिस्तानमध्ये सोमवारी २३ जणांना जबरदस्तीने त्यांच्या वाहनांमधून बाहेर काढले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. एएफपीच्या वृत्तानुसार, बलुचिस्तान प्रांतातील मुसाखेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी अनेक बस, ट्रक आणि व्हॅन रोखल्या. त्यानंतर दहशतवाद्यांनी जात ओळखून लोकांना गोळ्या घातल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेत पाच जण जखमीही झाले आहेत. मुसाखेलचे वरिष्ठ अधिकारी नजीबुल्ला काकर यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी पंजाबला बलुचिस्तानशी जोडणाऱ्या महामार्गावर अनेक बस, ट्रक आणि व्हॅन थांबवल्या. त्यानंतर हा हल्ला केला. या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला, तर ५ जण जखमी झाले. पुढे ते म्हणाले की, पंजाबमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली आणि पंजाबमधून येणाऱ्या लोकांची ओळख पटवून त्यांना गोळ्या घालण्यात आल्या.

१० वाहनांना लावली आगपाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, सहाय्यक आयुक्त नजीब काकर यांनी सांगितले की, सशस्त्र लोकांनी मुसाखेल येथे महामार्ग रोखला आणि प्रवाशांना खाली उतरवले. तसेच, त्यांनी १० वाहनेही पेटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे.

काय म्हणाले बलुचिस्तानचे मुख्यमंत्री?या घटनेनंतर बलुचिस्तानचे मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी निवेदन जारी केले आहे. या दहशतवादी घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. निवेदनानुसार, त्यांनी दहशतवाद्यांच्या भ्याड कृत्यात मारल्या गेलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, दहशतवादी आणि त्यांना मदत करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही. बलुचिस्तान सरकार दोषींना शिक्षा देईल.

टॅग्स :Pakistanपाकिस्तान