शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनमध्ये अतिरेकी स्फोटात २२ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 03:27 IST

मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिसने घडविलेल्या आत्मघाती स्फोटात २२ जण ठार

लंडन : मॅन्चेस्टरमध्ये सोमवारी रात्री अमेरिकी पॉप स्टार एरियाना ग्रांदे हिच्या संगीताच्या कार्यक्रमातून हजारो लोक बाहेर पडत असताना इसिसने घडविलेल्या आत्मघाती स्फोटात २२ जण ठार, तर ५९ जण जखमी झाले. या कार्यक्रमासाठी तरुण व किशोरवयीन मुले मोठ्या प्रमाणात आली होती. या हल्ल्यात अशी अनेक मुले बळी पडली असल्याची शक्यता आहे. शो संपल्यावर एरियाना ही स्टेजवरून गेल्यानंतर हा स्फोट झाला. ब्रिटिश पोलिसांनी सांगितले की, या स्टेडियमची क्षमता २१ हजार असून, ते पूर्णपणे भरले होते. लोक बाहेर पडतानाच हा स्फोट झाला. स्फोटानंतर लोक सैरावैरा पळू लागले. मॅन्चेस्टर एरिना हे शहराचे सर्वात मोठे ठिकाण आहे. येथे नेहमीच संगीताचे कार्यक्रम होतात. त्यामुळे तिथे अनेक टॅक्सी उभ्या असतात. स्फोट झाल्यानंतर लोकांना मोफत सुरक्षित पोहोचविण्याचे काम या टॅक्सीचालकांनी केले. तसेच स्थानिकांनीही अनेकांना रात्री आपल्या घरी राहण्याची व्यवस्था केली. या स्फोटात ठार झालेल्या आत्मघाती हल्लेखोराचे नाव सलमान अबेदी असे होते व तो २२ वर्षांचा होता, असे मॅन्चेस्टर पोलिसांनी मंगळवारी रात्री जाहीर केले. मात्र तो कोणत्या देशाचा नागरिक होता हे त्यांनी लगेच उघड केले नाही. हल्लेखोराची ओळख पटल्यानंतर दहशतवादविरोधी पथकांनी संपूर्ण मॅन्चेस्टरमध्ये जोरदार धाड व झडतीसत्र सुरु केले. त्यात ठार झालेल्या हल्लेखोराच्या एका २२ वर्षांच्या संशयित साथीदारास अटक केली गेली. त्याचे नाव व नागरिकत्वही पोलिसांनी तूर्त जाहीर केले नाही.

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.सर्वच देशांच्या प्रमुखांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनीही घटनेची निंदा केली आहे. ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकांच्या काही आठवडे अगोदरच हा हल्ला झाल्याने थेरेसा मे आणि लेबर पार्टीचे जेरेमी कोर्बिन यांनी प्रचार मोहीम स्थगित केली आहे. लंडनमध्ये ७ जुलै २००५ मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. मध्य लंडनमध्ये त्यावेळी साखळी स्फोट घडवून आणण्यात आले होते. यात ५२ ठार, तर ७०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.