शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अपघातग्रस्त विमानातील २१ जणांचे मृतदेह सापडले; ठाण्यातील चार जणांसह सर्व जणांचा मृत्यू झाल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 08:01 IST

पोखरा येथून रविवारी सकाळी या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले.

काठमांडू : नेपाळमधील तारा एअर कंपनीच्या विमानाला रविवारी झालेल्या अपघातातील २१ मृतदेह आतापर्यंत हाती लागले आहेत. विमानातील ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चार जणांसह सर्व २२ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अतिशय खराब हवामानामुळे नेपाळच्या मुस्तांग जिल्ह्यात या विमानाला अपघात झाल्याचे सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी ऑफ नेपाळ (सीएएएन) या यंत्रणेने प्राथमिक चौकशी अहवालात म्हटले आहे.

पोखरा येथून रविवारी सकाळी या विमानाने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच ते कोसळले. जोमसोम येथे जाणाऱ्या या विमानात ठाण्याच्या त्रिपाठी कुटुंबातील चार सदस्य, दोन जर्मन व १३ नेपाळी नागरिक असे १९ प्रवासी व ३ विमान कर्मचारी होते. विमानाचे अवशेष जिथे सापडले तिथे शोधकार्यासाठी सुमारे १०० जणांचे पथक कार्यरत आहे. त्यामध्ये नेपाळी लष्कराचे सैनिक, पोलीस, प्रशिक्षित गिर्यारोहक व स्थानिकांचा समावेश आहे. तारा कंपनीचे विमान कोसळल्यानंतर ते एका डोंगराला धडकले व त्याचे अनेक तुकडे झाले. त्या धडकेने विमानातील लोकांचे मृतदेह आजूबाजूच्या डोंगराळ प्रदेशात विखुरले गेले. 

अपघातग्रस्त विमानाची जी छायाचित्रे सोशल मीडियावर झळकली आहेत, त्यामध्ये या विनानाची शेपूट व एका पंखाचे अवशेष दिसत आहेत. नेपाळ सरकारच्या हेलिकॉप्टरमधून शोधपथकातील जवानांना अपघातस्थळी उतरविण्यात आले. रविवारी खराब हवामानामुळे अडथळे आल्याने थांबवावे लागलेले शोधकार्य सोमवारी सकाळपासून पुन्हा सुरू करण्यात आले. २०१६ साली तारा एअर कंपनीच्या विमानाला झालेल्या अपघातात २३ जणांचा मृत्यू झाला होता. २०१८ साली त्रिभुवन विमानतळावर झालेल्या विमान अपघातात ५१ जण ठार झाले होते. त्याआधी २०१२ साली सीता एअरच्या विमान अपघातात १९ जण, तर २०१२च्या विमान अपघातात १२ जण ठार झाले होते. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Nepalनेपाळ