शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

डाेनेत्स्कमध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात २० जणांचा मृत्यू; युक्रेन आणि रशियाचे एकमेकांवर खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 07:13 IST

विसाव्या दिवशीही चर्चा

माॅस्काे/कीव्ह : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धविरामाबाबत चर्चा सुरू असतानाच रशियाने जाेरदार हल्ले केले आहेत. युक्रेनचे महत्त्वाचे खेर्सन शहर ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे पूर्वेकडील डाेनेत्स्क भागात रशियाने केलेल्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या हल्ल्यात २० नागरिकांचा मृत्यू झाला. रशियाने मात्र या हल्ल्याचे खापर युक्रेनवर फाेडले आहे. 

डाेनेत्स्कमध्ये माेठा क्षेपणास्त्र हल्ला झाला. त्यात २० नागरिक ठार, तर ३५ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यावरून दाेन्ही देशांनी एकमेकांवर आराेप केले आहेत. युक्रेनने हल्ल्याचा आराेप फेटाळला असून रशियानेच क्षेपणास्त्र हल्ला केल्याचे म्हटले आहे. शांततेसाठी झालेली चर्चेची चाैथी फेरीही निष्फळ ठरली. तरीही चर्चा कायम राहणार असल्याचे दाेन्ही देशांनी म्हटले आहे. त्याच वेळी युक्रेनच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिलेले पाेलंड, चेक रिपब्लिक आणि स्लाेवेनियाचे पंतप्रधान युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी कीव्ह येथे दाखल झाले आहेत. युराेपियन महासंघाचा युक्रेनला भक्कम पाठिंबा असल्याचा संदेश या दाैऱ्यातून देण्यात आला आहे. 

आणखी एका वृत्त वाहिनीवर युद्धाला विराेध

युक्रेनवर हल्ला केल्यावरून रशियामध्येही अंतर्गत विराेध हाेत आहे. काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या सर्व पत्रकारांनी थेट प्रक्षेपणादरम्यान राजीनामा दिल्याचे जाहीर केले हाेते. आता चॅनल वन या रशियन वृत्त वाहिनीतील निर्माती मरिना ओव्हस्यानिकाेव्हा हिने थेट प्रक्षेपणादरम्यान ‘नाे वाॅर’ असा फलक झळकावला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बातमीपत्र सुरू असतानाच ती, युद्ध नकाे, युद्ध थांबवा. ते तुमच्याशी खाेटे बाेलत आहेत. प्रचारावर विश्वास ठेवू नका, असे ओरडू लागली. तिला अटक करण्यात आली आहे. 

रशियाने युराेपला हाेणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा राेखला आहे. यमल-युराेप पाईपलाईनद्वारे हाेणार पुरवठा बंद करुन ताे इतरत्र वळविण्यात आला आहे. या पाईपलाईनद्वारे पाेलंड आणि जर्मनीला पुरवठा हाेताे. मात्र, दाेन्ही देशांनी युक्रेनची बाजू घेतल्यामुळे रशियाने हा निर्णय घेतला आहे. पाईपलाईन बंद केल्यामुळे युराेपमध्ये नैसर्गिक वायूचे दर भडकले आहेत.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशिया