शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

हेलिकॉप्टर कोसळून युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह १८ जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 08:45 IST

मृतांमध्ये दोन वरिष्ठ अधिकारी, तीन बालकांचा समावेश

कीव्ह : युक्रेनचे एक हेलिकाॅप्टर बुधवारी कोसळून त्या देशाचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की तसेच त्या खात्यातील काही वरिष्ठ अधिकारी यांच्यासह १८ जणांचा मृत्यू झाला, तर काही जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे.

गेल्या चार दिवसांत युक्रेनमध्ये घडलेली ही सर्वात मोठी दुर्घटना आहे. काही दिवसांपूर्वी रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात युक्रेनच्या एका निवासी इमारतीतील काही रहिवासी ठार झाले होते. युक्रेनचे हेलिकॉप्टर कोसळण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या  दुर्घटनेमागे रशियाचा हात आहे का, याबाबत युक्रेनने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. युक्रेनमधील ब्रोव्हरी येथे हेलिकॉप्टर कोसळून १८ जण ठार झाल्याच्या दुर्घटनेबाबत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेन्स्की यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. त्या देशाचे गृहमंत्री डेनिस मोनास्टिरस्की यांचा हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाल्याबद्दल ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेव्हमन यांनी दु:ख व्यक्त केले आहे. (वृत्तसंस्था)

अमेरिकेत विमान कोसळून चार ठार

अमेरिकेत छोट्या आकाराचे एक विमान मंगळवारी कोसळून झालेल्या दुर्घटनेत टेनेन्सी चर्चच्या चार ख्रिश्चन धर्मगुरूंचा मृत्यू झाला व एक धर्मगुरू जखमी झाला आहे. टेक्सास विमानतळावर हे विमान उतरण्याच्या काही वेळ आधी हा अपघात झाला. हे विमान योकुम येथील शेतात कोसळले.

इंजिनात बिघाड झालेले विमान सुखरूप उतरविले

ऑस्ट्रेलियातील क्वांटास या कंपनीचे प्रवासी विमान न्यूझीलंडवरून सिडनी येथे येत असताना दोनपैकी एक इंजिन खराब झाले. तरीही पायलटनी हिंमत दाखवून हे विमान एका इंजिनावर चालविले व सिडनी येथील विमानतळावर सुरक्षितपणे उतरविले. त्या विमानात १४५ प्रवासी होते. त्यांच्यापैकी एकालाही दुखापत झाली नाही.

टॅग्स :Helicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटना